जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावातील अवैध कत्तल खाणे बंद करा,अन्यथा कारवाई-इशारा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील खाटीक व्यावसायिकांना मनाईत स्वतंत्र कत्तलखाना बांधून दिला असताना शहरात अवैधरित्या वैध गोवंश हत्या करणे चुकीचे असून तो तातडीने बंद करून निर्धारित ठिकाणीच हा व्यवसाय करावा अन्यथा या अवैध कत्तल खाणे चालविणाऱ्यांचे गाळे जप्त करण्यात येतील असा इशारा कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज दिल्याने अवैध कत्त्तलखाने चालविणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

कोपरगाव पालिकेने ज्या ठिकाणी हे मांस विक्रीची परवानगी दिली आहे.त्याच ठिकाणी ती करावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल व आपल्यातील मूळ विजय वहाडणे जागा करण्यास भाग पाडू नका-विजय वहाडणे,अध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नगर परिषदेने संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत जवळपास एक कोटी रुपयांची रक्कम खर्च करून कत्तलखान्याची उभारणी केली आहे.नगराध्यक्ष पदी विजय वहाडणे निवडून आल्यावर त्यांनी गावातील अवैध कत्तल खाणे बंद करण्यासाठी नगरपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळ यांचेकडे पाठपुरावा करून २०११ पासून प्रलंबित असलेल्या या नागरिकांची कत्तल खाण्याची समस्या दूर केली होती.मात्र तरीही पशूंची रीतसर कत्तल करणाऱ्या खाटीक बांधवांची गैरसोय दूर केली होती.त्या ठिकाणी चालचित्रण कॅमेरे बसवले गेला आहे.व त्या ठिकाणी म्हैस वर्गीय जनावरे कापण्यास परवानगी दिली आहे.त्याला बरेच दिवस उलटूनही हे खाटीक गावातच घर व तत्सम ठिकाणी अवैध रित्या जेथे नगरपरिषदेची परवानगी नाही अशा ठिकाणी जनावरांची कत्तल करून त्याची दुर्गंधी गावात पसरवत असल्याच्या अनेक तक्रारी नगरपरिषदेकडे आल्या होत्या व त्यां प्राण्यांचा रक्ताचे पाट थेट गटारीत वहात असल्याचे अनेक नागरिकांनी निदर्शनास आणले आहे.व त्या बाबत तक्रारी होत्या.व ते पाणी थेट पवित्र गोदावरीत जात असल्याची त्यांची तक्रार होती.त्यामुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावत होत्या.त्याची दखल घेऊन नुकतीच या खाटीक व्यावसायिकांची तातडीची बैठक नगरपरिषद कार्यालयात अध्यक्ष वहाडणे यांनी नुकतीच बोलावली होती.त्यात त्यांनी हा कठोर इशारा दिला आहे.

या वेळी संजयनगर परिसरातील नगरसेवक अल्ताफ कुरेशी,प्रभारी आरोग्य निरीक्षक सुनील आरणे,वसुली विभागाचे राजेंद्र गाडे,वसुली विभागाचे प्रमुख खैरे,बहुसंख्य खाटीक बांधव आदी मान्यवर उपस्थित होते.

त्यावेळी अध्यक्ष वहाडणे यांनी बाजार समितीच्या पूर्व फाटकाच्या पूर्व बाजूकडील खाटीक व्यावसायिकांना उपलब्ध करून दिलेले बावीस गाळ्यांचा वापर करत नसल्याची तक्रार होती.व त्या गाळ्यांचे भाडे थकविले असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.त्यावेळी खाटीक बांधवांनी कोरोना विषाणूच्या कालखंडातील भाड्यात काही सूट द्यावी अशी मागणी केली होती.मात्र त्याला नगरपरिषदेने नकार दिला आहे.व असे केल्यास शहरातील एक हजार गाळेधारक अशीच मागणी करतील व नगरपरिषेचे अर्थचक्र रुतून बसेल व विकास ठप्प होऊन जाईल असे विदित केले आहे.व त्या ऐवजी त्यात दोन दोन टप्पे करून दिले आहे.त्याला या नागरिकांनी संमती दर्शवली आहे.व कोपरगाव पालिकेने ज्या ठिकाणी हे मांस विक्रीची परवानगी दिली आहे.त्याच ठिकाणी ती करावी अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल व आपल्यातील मूळ विजय वहाडणे जागा करण्यास भाग पाडू नका असेही स्पष्ट बजावले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close