जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“तो”आरोप गैरसमजातून बाजार समिती सचिवांचा खुलासा

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्टर असोशिएशनच्या वतीने नुकताच बाजार समितीच्या आवारात डिजिटल फलकाचा अनावरण सोहळा हा चुकीच्या ठिकाणी केल्याने आपण “तो”फलक हा वाहतुकीस अडथळा ठरत असल्याने अन्यत्र हलवला असल्याचा दावा कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी केला आहे.त्यामुळे ट्रक चालक-मालक संघटनेचा आरोपावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“आम्ही या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास बांधील आहोत.यात कुठलाही संदेह नाही.व सरकारच्या निर्णयाला बांधील आहोत.फक्त ट्रक चालक-मालक संघटनेने हा फलक वजन काट्याजवळ लावल्याने तो अवजड वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तो काढून बाजार समितीच्या पूर्व दरवाजाच्या जवळ व बाजार समितीच्या कार्यालयासमोर लावला आहे”-नानासाहेब रणशूर-सचिव,कोपरगाव बाजार समिती.

माल वाहतूक ट्रकमध्ये माल भरताना व खाली करताना ट्रक चालक-मालक यांचे कंबरडे मोडले आहे.त्यांच्या मागे थर्ड पार्टी विमा,ट्रक मधील मालाचा विमा काढणे.इंधन दर वाढ,अशा अनावश्यक कामगिरीने वाहतुकदारांचे कंबरडे मोडले आहे.मात्र याबाबत कोणीही विचार करायला तयार नाही.त्यामुळे माल वाहतुकदारांत मोठा असंतोष पसरला आहे.या विरोधात देशभर वणवा पसरला असून त्याचे पडसाद कोपरंगावातही उमटले आहे.व याविरोधात कोपरगाव येथील ट्रक चालक-मालकांनी नुकतीच संघटना स्थापन करून या संघटनेने प्रथमच आवाज उठवला आहे.सरकारने सन २०१६ साली ज्याचा माल त्याचा हमाल हे धोरण जाहीर करून ट्रक चालकांची या अन्यायकारक नियमातून सुटका केली आहे.या संघटनेने कोपरगाव बाजार समितीच्या परवानगीने बाजार समितीच्या आवारांत फलक वजन काट्याजवळ लावला होता.तो काही असामाजिक तत्त्वांनी बेकायदा काढून टाकल्याने याबाबत या संघटनेने बाजार समितीचे काही व्यापारी व बाजार समितीचे सचिव यांचे विरुद्ध आरोप केल्याने या संघटनेने हा फलक काढून टाकल्याची आरोप केला होता.याबाबत या संघटनेने रीतसर साई ट्रेडर्सचे राजू सांगळे व ऋषी सांगळे यांच्या विरुद्ध दमबाजी व जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती.त्यामुळे खळबळ उडाली होती.त्यावर हा खुलासा कोपरगाव बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशूर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिला आहे.

या प्रसंगी ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्टर असोशिएशन बाबत बोलताना म्हणाले की,”आम्ही या सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास बांधील आहोत.यात कुठलाही संदेह नाही.व सरकारच्या निर्णयाला बांधील आहोत.फक्त ट्रक चालक-मालक संघटनेने हा फलक वजन काट्याजवळ लावल्याने तो अवजड वाहतुकीला अडथळा ठरत असल्याने तो काढून बाजार समितीच्या पूर्व दरवाजाच्या जवळ व बाजार समितीच्या कार्यालयासमोर लावला आहे.त्यामुळे हा गैरसमज निर्माण झाला असावा असा कयास वर्तवला आहे.त्यामुळे या विषयावर पडदा पडण्यास मदत झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close