कोपरगाव तालुका
कोपरगावात “ज्याचा माल,त्याचा हमाल” योजना कार्यरत !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नूतन वर्ष व दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कोपरगाव तालुका ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्टर अशोशिएशनच्या वतीने कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तसेच अण्णाभाऊ साठे चौकात “ज्याचा माल,त्याचा हमाल” या डिजिटल फलकाचा अनावरण सोहळा नुकताच मोठ्या संपन्न झाला आहे.
माल वाहतूक ट्रकमध्ये माल भरताना व खाली करताना ट्रक चालक-मालक यांचे कंबरडे मोडले आहे.त्यांच्या मागे थर्ड पार्टी विमा,ट्रक मधील मालाचा विमा काढणे.इंधन दर वाढ,अशा अनावश्यक कामगिरीने वाहतुकदारांचे कंबरडे मोडले आहे.मात्र याबाबत कोणीही विचार करायला तयार नाही.याबाबत कोपरगावकरांनी आता आवाज उठवला आहे.
माल वाहतूक ट्रकमध्ये माल भरताना व खाली करताना ट्रक चालक-मालक यांचे कंबरडे मोडले आहे.त्यांच्या मागे थर्ड पार्टी विमा,ट्रक मधील मालाचा विमा काढणे.इंधन दर वाढ,अशा अनावश्यक कामगिरीने वाहतुकदारांचे कंबरडे मोडले आहे.मात्र याबाबत कोणीही विचार करायला तयार नाही.त्यामुळे माल वाहतुकदारांत मोठा असंतोष पसरला आहे.या विरोधात देशभर वणवा पसरला असून त्याचे पडसाद कोपरंगावातही उमटले आहे.व याविरोधात आवाज उठवला आहे.आज त्याचे प्रतिबिंब उमटले आहे.
या प्रसंगी ट्रक चालक-मालक ट्रान्सपोर्टर असोशिएशन अध्यक्ष आयुबभाई कच्छी,उपाध्यक्ष भारत वैद्य,सचिव शैलेश रावळ,उल्हास शेठ,आडत व्यापारी ललीत धाडीवाल,मुकेश शेठ,सचिन सोनवणे,ब्बासभाई,डॉ.शब्बीर,प्रकाश,श्री हरकलमामा,विकास वाळूंज,नंदू वाळूंज,सुनील गिते,राजू कच्छी, बबलू तिवारी,ऋषी आंबोरे,शार्दूल भाऊ,फय्याजभाई, इक्बाल भैय्या,मंटू सोनवणे,अरूण सोमासे,हबीबमामू,बबूभाई,पप्पू सिंग,उमेश,गणेश,सलिम,पप्पू सोमासे,अमोल,आदी मान्यवरांसह अनेक सभासद उपस्थित होते.