कोपरगाव तालुका
कोपरगावात विकास कामांचे उदघाटन संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर कोपरगाव नगरपरिषदेच्या स्थानिक विकास निधी मधून साई वृंदावन कॉलनी टाकळी रोड येथे राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधीक्षक डॉक्टर श्रीकृष्ण फुलसुंदर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.
या प्रसंगी प्रभागाचे नगरसेवक जनार्दन कदम,वैभव गिरमे,निंबाशेठ शिरोडे,डॉक्टर नीलिमा आव्हाड,लक्ष्मीनारायण भट्टड,बाळासाहेब देवकर,सुरेश वाणी,आप्पा हिंगमिरे आदींसह सर्व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
सदर प्रसंगी निवारा सोसायटी येथे जगदंबा माता परिसर येथे कोपरगाव नगरपरिषद स्थानिक विकास निधीतून हायमॅक्सचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या प्रसंगी परिसरातील सर्व महिला भगिनी व नागरिक उपस्थित होते.