जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भूमिपूजन फटाके फोडले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी कलम १४४ लागू असताना कोपरगाव शहरात आज दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास वीघ्नेश्वर चौक खैरे कॉम्प्लेक्स समोर बेकायदा जमाव जमवून मानवी जीवितास धोका होईल असे वर्तन केल्याने कोपरगाव शहर पोलिसानी आज नगरसेवक सत्येन सुभाष मुंदडा रा.इंदिरापथ कोपरगांव,भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र रामदास बोरावके रा.जेऊर पाटोदा ता.कोपरगांव,सुशांत सुभाष खैरे रा.जयमल्हार कॉम्पलेक्स, विघ्नेश्वर चौक कोपरगांव,सोमनाथ जगन्नाथ आहिरे रा.इंदिरानगर,कोपरगांव,कुणाल संतोष पवार रा.ओमनगर कोपरगांव,प्राजक्ता सुशांत खैरे रा.जय मल्हार कॉम्पलेक्स कोपरगांव,अमृता श्रीकांत खैरे आदी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

कोपरगावात फटाके फोडणारे रामभक्त चांगलेच अडचणीत आले आहेत.गुन्हा दाखल करण्यात आलेले कार्यकर्ते हे जुना भाजप तथा कोल्हे समर्थक कार्यकर्ते आहेत.त्यांना राम मंदिराचे फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहेत.त्यांनी सुरक्षित अंतराचा फज्जा उडवल्याने हि आफत ओढवली असल्याचे मानले जात आहे.त्यावर शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बहुप्रतीक्षित राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला आहे. भूमिपूजनाच्या निमित्तानं देशभरात आज उत्साहाचं वातावरण होतं.तर दुसरीकडे भाजपाच्या अनेक नेत्यांनी आपल्या घरांमध्येही प्रभू श्रीरामाचं पूजन केलं. भूमिपूजनाच्या निमित्तानं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भजन गायल्याचं पाहायला मिळाल असताना कोपरगाव शहरात मात्र त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदीच्या आदेशकडे साफ दुर्लक्ष केल्याने त्यांना त्याची आज किमंत चुकवावी लागली असल्याचे चित्र आहे.आज दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास वरील सात कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला व पेढे वाटले.मात्र पोलिसानी आधीच या बाबत सूचना दिलेली असल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांवर थेट गुन्हाच दाखल केला आहे.या बाबत फिर्यादी पो.कॉ.रामकृष्ण गोरख खारतोडे (वय 29)कोपरगाव शहर पोलीस ठाणे यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की.” वरील सात आरोपीनी बेकायदेशिर जमाव जमवुन जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशाची अवज्ञा करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशी घातक कृती केली आहे व तसेच कोणत्याही व्यक्तीस दुखापत अगर नुकसान पोहचु शकतो इतक्या बेदरकारपणे किंवा हयगईने सार्वजनिक रस्त्यावर फटाके वाजविले व जिल्हादंडाधिकारी यांचे कारोना विषाणु संदर्भातील आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.या फिर्यादीवरुन सदरचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.४०६ /२०२० भा.द.वि.क.१४३,१८८,२६९,२७०,२८५,२८६ प्रमाणे आपल्या दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे कोपरगावात रामभक्त अडचणीत आले आहेत.गुन्हा दाखल करण्यात आलेले कार्यकर्ते हे जुना भाजप तथा कोल्हे समर्थक कार्यकर्ते आहेत.त्यांना राम मंदिराचे फटाके फोडणे चांगलेच महागात पडले आहेत.त्यांनी सुरक्षित अंतराचा फज्जा उडवल्याने हि आफत ओढवली असल्याचे मानले जात आहे.त्यावर शहरात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close