जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

या पुढेही नगराध्यक्ष वहाडणे यांना विकासकामांना पाठींबा-विश्वास

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहराच्या विकासासाठी कोपरगाव नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्षांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना दिल्या होत्या.त्यामागे कोपरगाव शहराचा विकास व्हावा हि एकमेव भूमिका होती.ती भूमिका त्यावेळीही होती व यापुढेही विकासासाठी निधी देण्यास कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

गेल्या चार वर्षात माजी आ.कोल्हे यांच्या नगरसेवकांनी प्रभागात ढुंकून देखील पाहिले नाही.त्यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाची १५ दिवसातच खडी उघडी पडली त्यावरून दर्जा लक्षात येतो.मागील पाच वर्षात त्यांच्या नेत्यांनी कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी आणला असता तर कोपरगाव शहर चकाचक झाले असते.मात्र त्यांचा राजकारण एके राजकारण एवढाच अजेडा अजून कोल्हे म्हणजे भाजपच्या विराट वृक्षावर आलेलं बांडगूळाचं रोपट आहे-प्रा.सुभाष शिंदे,माजी शहराध्यक्ष भाजप.

कोपरगाव शहरातील विविध रस्त्यांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आ. काळे यांच्या शुभहस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी प्रजापिता ब्रम्हकुमारी सरलादीदी,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,गटनेते नगरसेवक विरेन बोरावके,मंदार पहाडे,संदीप पगारे,अजीज शेख,प्रतिभा शिलेदार, श्रीम.वर्षाताई गंगूले, माधवी वाकचौरे,मेहमूद सय्यद,सुनील शिलेदार,राजेंद्र वाकचौरे,शहराध्यक्ष नवाज कुरेशी,कार्याध्यक्ष वाल्मिक लहिरे,संदीप कपिले,विद्यार्थी शहराध्यक्ष स्वप्नील पवार,अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष जावेद शेख,ओबीसी सेल अध्यक्ष राहुल देवळालीकर,सोशल मीडिया सेल अध्यक्ष चंद्रशेखर निकम,सामाजिक न्याय सेल अध्यक्ष रावसाहेब साठे,माजी नगरसेवक फकिर कुरेशी,दिनकर खरे,कृष्णा आढाव,प्रशांत वाबळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की,”जिल्हा नियोजनमधून विकासकामांसाठी २ कोटी रुपये व कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी रुपये निधी आणला.कोपरगाव शहराच्या विकासासाठी निधी मिळण्यासाठी शासनदरबारी ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या ठिकाणी आपण खंबीरपणे उभे राहून निधी आणू असे आश्वासन देवून लवकरच कोपरगाव शहराच्या प्रमुख रस्त्यांची कामे सुरु होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे देखील शहर विकासाच्या प्रश्नाबरोबरच पिण्याचे पाणी,रस्ते,आरोग्य आदी प्रश्नासह नागरिकांचे सर्वच मुलभूत प्रश्न सोडवून कोपरगाव शहराला जोडलेल्या ग्रामीण भागाचा देखील विकास करू असेही त्यांनी शेवटी म्हटले आहे.

यावेळी बोलतांना नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले की,नगराध्यक्ष झाल्यापासून शहराच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे.शहराचा विकास करतांना आ.काळे व त्यांच्या पक्षाचे नगरसेवक यांचे सहकार्य मिळत आहे.मात्र मागील पाच वर्षात माजी आमदारांनी विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य केले नाही व त्यांचे नगरसेवक देखील त्यांचाच कित्ता गिरवत असून विकास कामांना विरोध करीत आहे.यदाकदाचित त्यांनी सहकार्य केले असते तर आज कोपरगावचा चेहरा मोहरा बदलला असता अशी टीका माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे.विकास कामांच्या उदघाटन फलकावर प्रत्येक वेळी मी सर्व नगरसेवकांचे नावे टाकले मात्र मागील पाच वर्षात नगरपरिषदेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन मला न बोलविता माजी आमदारांनी गुपचूप केले यावरून राजकारण कोण करतं हे दिसून येते.ज्यांना राजकारण करायचे त्यांनी खुशाल राजकारण करावे यापुढे आ. काळेंच्या मदतीने आपण कोपरगाव शहराचा विकास करणार आहे. ज्या माजी आमदारांना आपल्या कार्यकाळात पाच नंबर साठवण तलावाचे काम करता आले नाही तेच काम आ.काळे यांनी निवडून येताच तीन महिन्यातच प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण करून हा जिव्हाळ्याच्या प्रश्न हाती घेतला आहे.पाच नंबर साठवण तलावाचे पुढील कामासाठी देखील ते निधी आणून वर्षानुवर्षापासून रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्की सोडवतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close