शैक्षणिक
..त्या वक्तव्याचा शिक्षक संघटनांकडून निषेध,कारवाईची मागणी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यातील शिक्षकांबद्दल कुठलीही माहिती न घेता असंवैधानिक टिपणी करून आपल्या वर्तमान पत्रात शिक्षकांच्या कामाचे अवमूल्यन करून त्यांना कस्पटासमान समजणाऱ्या ..त्या वृत्तपत्राच्या संपादकावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी कोपरगाव तालुका समन्वय समितीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात निवेदन देऊन नुकतीच केली आहे.
राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये जवळपास बारा लाख शिक्षक बंधू-भगिनी कार्यरत आहे.त्यांचे राज्य शासनाच्या आदेशानुसार दैनंदिन ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरु आहे.तथापि एका वृत्तपत्राच्या संपादकीयात मात्र या कामाची कोणतीही शहानिशा न करता पूर्वग्रह दूषित मानसिकतेने,”मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल काय ? अशा आचरट मथळ्याखाली एका इसमाने ? संपादकीय लिहून चिखलफेक केली आहे.
कोपरगाव शिक्षक समन्वय समितीने आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,”राज्यातील शासकीय व निमशासकीय शाळांमध्ये जवळपास बारा लाख शिक्षक बंधू-भगिनी कार्यरत आहे.त्यांचे राज्य शासनाच्या आदेशानुसार दैनंदिन ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सुरु आहे.तथापि एका वृत्तपत्राच्या संपादकीयात मात्र या कामाची कोणतीही शहानिशा न करता पूर्वग्रह दूषित मानसिकतेने,”मास्तरड्यांनो जरा जास्त काम केले तर मराल काय ? अशा आचरट मथळ्याखाली एका इसमाने ? संपादकीय लिहून त्यात शिक्षकांबद्दल गरळ ओकली आहे.व त्यात शिवराळ भाषा वापरली असून शिक्षकांची बदनामी व शिक्षकांचा अपमान केला आहे.त्यामुळे राज्यातील शिक्षकांची प्रतिमा मलिन झाली आहे.व त्यांच्या प्रतिमेचे हनन झाले आहे.या प्रवृत्तीवर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे.अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर ज्ञानेश्वर माळवे,अशोक कानडे,दत्तात्रय गरुड, राहुल घोडे,संजय खरात, पितांबर पाटील, जनार्दन भवरे, वाल्मिक गायकवाड,सुभाष गरुड,रतन वाघ,दीपक झावरे,सुदाम साळुंके,आदींच्या सह्या आहेत.