जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

अवैध वाराई-हमाली घेणा-या व्यापा-यावंर गुन्हे दाखल करणार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव ट्रक चालक मालक,ट्रान्सपोर्ट असोशिएशन तर्फ अवैध वाराई-हमाली बंद करण्यासाठी शिर्डी उपविभागीय पोलिस अधिक्षक सातव यांना शिर्डी येथे निवेदन देण्यात आले आहे,त्यामुळे अवैध वाराई-हमाली घेणाऱ्या व्यापाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

काही व्यापारी गुपचूपपणे कोपरगाव तालुक्यात वाराई-हमाली घेत आहे असे आढळल्यास सदर व्यापा-यांवर कोपरगाव ट्रक चालक मालक युनियन तर्फ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे-अयुब कच्छी अध्यक्ष,कोपरगाव ट्रक चालक मालक असोशिएशन

महाराष्ट्र शासनाने दि.०६ सप्टेंबर २०१६ रोजी दिलेल्या आदेशान्वये ज्याचा माल त्याचा हमाल हा शासन निर्णय लागू केलेला असतानाही काही व्यापारी आडमुठी भूमिका घेऊन ट्रक वाहनधारकाकडून जोरजबरदस्तीने वाराई हमाली घेऊन त्यांची फसवणूक करत आहे.ती त्वरित बंद करण्याची रास्त मागणी ट्रक चालक मालक असोसिएशनने केली आहे.

त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,माथाडी कायद्यामध्ये वाराई हा शब्द नाही व तो गाडीवाल्याला देणे बंधनकारक नाही.परंतू काही व्यापारी गुपचूपपणे कोपरगाव तालुक्यात वाराई घेत आहे असे आढळल्यास सदर व्यापा-यांवर कोपरगाव ट्रक चालक मालक युनियन तर्फ गुन्हे दाखल करण्यात येणार आहे असा इशारा देण्यात आला आहे.
तसेच अहमदनगर,श्रीरामपूर,कोपरगांव येथिल मालधक्का हुंडेकरी हे बाहेरील गाडयांना वाराई देण्यास भाग पाडत आहे.सदर हुंडेकरी ठेकेदार यांनी उदरनिर्वाह करण्याकरीता ट्रक घेतलेल्या नाहीत,तर त्यांनी ठेका चालविण्याकरीता ट्रक घेतलेल्या आहेत.वाराई बंद निर्णयानंतर ते स्वतःचे ट्रक पाठवून नियमबाह्य वाराई देत आहे व शासन निर्णयाचा भंग करीत आहे.सदर ठेकेदारांनी शासन निर्णय मोडून कोपरगाव,श्रीरामपूर,राहाता तसेच नगर जिल्हयात त्याच्या गाडया ओव्हरलोड पाठविल्या तर त्या गाडया परिवहन कार्यालयात जमा करण्यात येईल याची दखल संबधित ठेकेदारांनी घ्यावी.असा इशाराही शेवटी ट्रक चालक-मालक संघटनेने दिला आहे.

निवेदनावर संघटनेचे कोपरगाव तालुका अध्यक्ष अयुब कच्छी,भारत वैद्य,शैलेश रावळ, उल्हास दोषी,राजू शहा,सचीन सोनवणे आदींच्या सह्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close