जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

वारकरी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार संपन्न

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनीधी)

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या कोपरगाव शहर सप्ताह व दिंडीच्या प्रमुखपदी ह.भ.प.भीमराज महाराज जाधव तर अखिल वारकरी संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भोजडे येथील ह.भ.प.परशूराम महाराज अनर्थे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी नुकताच सत्कार केला आहे.

अखिल भारतीय वारकरी मंडळ व अखिल भारतीय वारकरी संघाच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच त्यांच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निवड केली आहे.त्यांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.त्यात कोपरगाव शहर सप्ताह व दिंडीच्या प्रमुखपदी भीमराज महाराज जाधव यांची तर अखिल वारकरी संघ महाराष्ट्र राज्य अहमदनगर उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी भोजडे येथील ह.भ.प.परशूराम महाराज अनर्थे यांची निवड जाहीर झाली आहे.ही निवड आगामी तीन वर्षासाठी जाहीर झाली आहे.

ह.भ.प।अनर्थे महाराज गेल्या बारा वर्षांपासून जवळजवळ दर वर्षी पन्नास अनाथ मुलांना शिक्षण देत आहे.त्यांना शिकवत आहे.ज्यांची परिस्थिती नाही,त्यांचे लग्न ही लावून देत आहे.गावो गावी कीर्तन,प्रवचन सेवा करून त्यातून समाज प्रभोंधन करून जनजागृती करत आहे.व समाजाच्या अनिष्ठ रूढी,परंपरा यावर आघात करून जनतेला जागृत करत आहे.समाजातील अनाथ बालक व निराधारांना ते सांभाळत आहे.या दोन्हीं पदाधिकाऱ्यांचा सत्काराचे आयोजन नुकतेच कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष मंगेश पाटील यांनी केले होते.

अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. अनिल महाराज वाळके आणि नगर जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गणेश महाराज डोंगरे यांनी ही नियुक्ती केली आहे.अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या नियमावलीनुसार जाधव यांना वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार, दिंडी व अन्य कामे करायची आहेत. जाधव हे गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रभर प्रवचन आणि कीर्तने करीत आहेत.या दोन्ही पदाधिकाऱ्यांच्या कार्याचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी कौतुक केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Close