जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या कारखान्याचा गुरुवारी हंगामाचा शुभारंभ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा ६६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवार (दि.२९) रोजी सकाळी १०.०० वाजता कारखान्याचे जेष्ठ संचालक माजी आ. अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे व त्यांच्या धर्मपत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे यांच्या शुभहस्ते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी दिली आहे.

कोरोना संकटाची तीव्रता काही अंशी कमी झाली असली तरी धोका अजून कायम आहे. अशा परिस्थितीत गुरुवार रोजी होणारा गळीत हंगामाचा शुभारंभ देखील मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली आहे.

मागील सात ते आठ महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. राज्यात देखील कोरोनाने मोठे थैमान घातले होते. सार्वजनिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होवून संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक असल्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी शासनाकडून नियमावली घालून दिलेली आहे. त्या नियमावलीनुसार नुकताच पार पडलेला बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ देखील केवळ संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने पार पडला आहे. कोरोना संकटाची तीव्रता काही अंशी कमी झाली असली तरी सावट अजून कायम आहे. अशा परिस्थितीत गुरुवार रोजी होणारा

गळीत हंगामाचा शुभारंभ देखील मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येणार नाही याची व्यवस्थापनाला जाणीव असून त्याबाबत दु:ख देखील वाटत आहे. मात्र या कार्यक्रमाच्या माध्यमातून आ. आशुतोष काळे यांचे विचार ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऐकता यावे यासाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण www.facebook.com/ashutosh a kale या आ.काळे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. सर्व ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, कर्मवीर शंकररावजी काळे यांच्यावर व उद्योग समुहावर प्रेम करणारे हितचिंतक यांनी फेसबुकच्या माध्यमातून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कार्यकारी संचालक गिरीश जगताप यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Close