खेळजगत
खुल्या शोतोकोन कराटे स्पर्धेत…या विद्यार्थिनीस सुवर्ण पदक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्यस्तरीय ट्रेडीशनल खुल्या शोतोकोन कराटे स्पर्धेत कु.तेजस्विनी अमित खोकले हिस एक सुवर्ण व एक रौप्य पदक मिळाले असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सदर स्पर्धा कोपरगाव येथील कलश मंगल कार्यालयात दि.१८ डिसेंबर संपन्न झाल्या आहेत.कु.तेजस्विनी खोकले हिच्या यशाचे कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,पो.हे.कॉ.सुरेश बोटे,पो.हे.कॉ.युवराज खुळे आदींनी अभिनंदन केले आहे.तिला तिचे प्रशिक्षक सुदर्शन पांढरे यांचे मार्गदर्शन लाभले होते.विजेती कु.तेजस्विनी खोकले हि रुग्णवाहिका चालक अमित खोकले यांची कन्या आहे.