कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागात अद्यापही कोरोना विषाणूची साथ बऱ्या प्रमाणात नियंत्रणात आली असून गत सहा महिन्यात ०२ हजार ०६७ जणांना कोरोना विषाणूंचा डंख झाला असून तर आज अखेर ३७ जणांचा मृत्यू झाल्याने आता परिणामस्वरूप कोपरगाव शहर पोलिसानी आता आणखी कडक कारवाईची भूमिका घेतली असून आज सकाळी ११.०० च्या सुमारास समता पतसंस्थेच्या कार्यालानजीक केलेल्या कारवाईत नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यामुळे बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ०८५ इतकी झाली आहे.त्यात ४२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७७ टक्के आहे.आतापर्यंत ११ हजार ८०६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४७ हजार २२४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.६६ असा आढळला आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे,त्यामुळे कारवाई अटळ बनली असल्याचे मानले जात आहे.
आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ०२ हजार ०८५ इतकी झाली आहे.त्यात ४२ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत ३७ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७७ टक्के आहे.आतापर्यंत ११ हजार ८०६ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला ४७ हजार २२४ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर १७.६६ असा आढळला आहे.त्यामुळे कोरोना साथी बाबत नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.नागरिकांचा मुखपट्याविना असाच सर्वथैव संचार राहिल्यास कोरोना वाढत जाणार हे उघड आहे.आज पर्यंत मुखपट्या बांधल्याने या साथीवर चांगले नियंत्रण मिळवता येत असल्याचे सिद्ध झाले आहे.त्यामुळेच कोपरगाव शहरात आता कोरोना रुग्णाची संख्या नियंत्रणात आली असली तरी बेशिस्त नागरिकांमुळे हि साथ कधीही डोके वर काढू शकते.त्यामुळे मुखपट्या न बांधणाऱ्या नागरिकांचा बंदोबत करणे आजही पोलिसांना गरजेचे बनले आहे.त्यामुळे कोपरगाव शहर पोलिसानी पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आता कडक धोरण अवलंबले आहे.त्यातून हि कारवाई तहसील कार्यालयानजीक चौकात करण्यात आली आहे.
या कारवाईत आरोपी संजय अशोक कावडे, वय-३१, रा.पढेगाव,एकनाथ विठ्ठल कावडे,वय-४०,रा.पढेगाव,निवृत्ती भास्कर पवार,वय-३६,रा.बेळगाव ता.वैजापूर,जयंता विश्व पती दे,वय-२८.रा.पश्चिम बंगाल हा.मु.गायत्री कंट्रक्शन कोपरगाव,सागर बाळासाहेब पवार वय-२८,दीपक सत्यवान वाघ वय-२१,युसूफ दाऊद खान वय-२१,अमीर आयुब सय्यद,वय-२२,विवेक नागेश दवंगे वय-२३,रा.कोपरगाव आदीं नऊ जणांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.त्यात कोरोना विषाणूची साथ चालू असतानाही तोंडाला मुखपट्या न बांधणे,चालू गाडी चालवताना फोनवर बोलणे,शासनाने व जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंदात्मक कायदा १८९७ अन्वये दिलेले आदेशाचे उल्लंघन करताना आढळून आले आहे.आदी कारणाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी पोलिस अधिकारी अंबादास रामनाथ वाघ पो.कॉ.वय-३३,यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं.७७५/२०२० भा.द.वि.कलम १८८ (२),२६९,२७०, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.