जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शेतकऱ्यांना नुकसान तत्काळ भरपाई द्या-मागणी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतकरी वर्ग हैरान झालेला असतानाच थोडी फार वाचलेली पिके परतीच्या पावसाच्या तडाख्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्यांसमोर न भूतो न भविष्यातीअसे संकट उभे राहिले असल्याने सरकारने आता पंचनामे करण्यात वेळ घालविण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदन पाठवून केली आहे.

रविवारी दुपारी व सोमवारी पहाटे परतीच्या पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार तडाखा दिला. शेती व पिके अक्षरशः पाण्याखाली बुडाली.धान्य भाजीपाला भिजून गेला. काही ठिकाणी तर उभ्या पिकांसह शेती देखील वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहेत तर अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.जनावरांचे हाल झाले आहेत-राजेश परजणे,जि. प.सदस्य

निवेदनात त्यांनी पुढे नमूद केले आहे की, मागील वर्षीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांना गारपीटीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर दुष्काळ, अनेक ठिकाणी आलेले महापूर,त्यानंतर पुन्हा अवकाळी, त्यातच रोगराई अशा एक ना अनेक संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागले. त्यातून सावरत असताना आणि यावर्षी चांगल्या पीक पाण्याची अपेक्षा असताना सततच्या पावसाने फुलोऱ्यात आलेले सोयाबीन,कापूस,बाजरी,उडीद,मूग,तूर,कांदा,बटाटा,भात,ऊस या पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले.त्यातूनही शेतकऱ्यांनी स्वतःला सावरुन घेताना संकटातून वाचलेल्या पिकांची जपणूक केली होती. परंतु गेल्या आठवडाभरापासून परतीच्या पावसाने थैमान घातल्याने उरली सुरली पिके नष्ट करुन टाकली आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात रविवारी दुपारी व सोमवारी पहाटे परतीच्या पावसाने विजेच्या कडकडाटासह जोरदार तडाखा दिला. शेती व पिके अक्षरशः पाण्याखाली बुडाली.धान्य भाजीपाला भिजून गेला. काही ठिकाणी तर उभ्या पिकांसह शेती देखील वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी घरे पडली आहेत तर अनेकांची घरे पाण्याखाली गेली आहेत.जनावरांचे हाल झाले आहेत. थोड्याफार प्रमाणात वाचलेली पिके आणि फळबागांचे पूर्णपणे नुकसान झाल्याने हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. एकतर आधीच कोरोना महामारीमुळे कोलमडून गेलेल्या शेतकऱ्यांना व ग्रामीण भागातील जनतेला या नैसर्गीक आपत्तीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. यातून सावरणे अतिशय अवघड होवून बसले आहे. शेतीच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आता वेळ वाया घालण्याऐवजी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना पुन्हा उभे करण्यासाठी तातडीने आर्थिक मदत उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन पातळीवरुन तातडीने उपाय योजना राबविण्याबाबत संबंधित विभागांना आपण आदेश द्यावेत अशीही मागणी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री ना.अजित पवार,महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते ना. देवेद्र फडणवीस यांनाही पाठविण्यात आलेल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close