जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

भाकरी बरोबर चटणी तशी त्यांना पगारा बरोबर “ती”लागते

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव पंचायत समितीत समाजकल्याण विभागात जनतेची कामे करताना येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांना जशी भाकरी बरोबर चटणी असल्याशिवाय भाकर आत जात नाही तशीच अवस्था या विभागाची झाली असून यांना पगारासोबत “ती” (लाच) असल्याशिवाय हे कामच करत नाही अशी घणाघाती टीका कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन यांनी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांच्या समक्ष केल्याने तालुक्यात कोपरगाव पंचायत समितीच्या कारभाराची उलटसुलट चर्चा सुरु झाली आहे.

कोपरगाव पंचायत समितीचे तीन-चार अधिकारी हे काम करताना कोणाचेही ऐकत नाही अनेक वेळा चकरा मारूनही ते नागरिकांना वेठीस धरतात.त्यांना टेबलवर कागद ठेवायला नस्ती (फाईल) दिसत नाही ते कागदपत्र इकडे-तिकडे ठेवताना दिसतात.या खात्याच्या चार हजाराच्या सायकलला ते चार चकरा मारायला भाग पाडतात.जातीचा पुरावा म्हणून मुलाचा शाळेचा दाखला हा गुहित धरायला हरकत नसताना टी टाळाटाळ करताना दिसतात.व सामान्य नागरिकांना प्रांताकडे जायला भाग पडतात-कारभारी आगवन-माजी उपाध्यक्ष,कर्मवीर काळे कारखाना.

कोपरगाव तहसील कार्यालयात आज आ.आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न झाली त्यावेळी यांनी कोपरगाव पंचायत समितीच्या कारभाराचा जाहीर पंचनामा करताना ते बोलत होते.त्यांची धर्मपत्नी विमल आगवन या जिल्हा परिषदेच्या सदस्या व स्थायी समितीच्या सदस्या आहेत त्यामुळे त्यांच्या या आरोपाला महत्व प्राप्त झाले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,आज आ.काळे यांनीं पंचायत समिती,पशुसंवर्धन विभाग,आरोग्य,वाळूमाता प्रक्षेत्र,ग्रामीण रुग्णालय आदीं याच विभागाचा कारभाराचा आढावा घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी आमसभेचे आयोजन केले होते.त्यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.त्यावेळी आपल्या समस्या मांडताना त्यांनी हा आरोप केला आहे.त्यामुळे काही काळ सभागृह अवाक झाले.

त्यावेळी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर काळे सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,माजी गट नेते डॉ.अजय गर्जे,जि. प.सदस्य सुधाकर दंडवते,कर्मवीर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन,पंचायत समिती सदस्य श्रावण आसने,मधुकर टेके,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी,जिनिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,युवा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,प्रशांत वाबळे,माजी नगरसेवक रमेश गवळी,जि.प.सदस्या सोनाली राहुल रोहमारे,कोपरगाव पंचायत समिती गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी डॉ.कृष्णा फुलसुंदर,तालुका पशु संवर्धन अधिकारी डॉ. आदी मान्यवरांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोपरगाव पंचायत समितीचे तीन-चार अधिकारी हे काम करताना कोणाचेही ऐकत नाही अनेक वेळा चकरा मारूनही ते नागरिकांना वेठीस धरतात.त्यांना टेबलवर कागद ठेवायला नस्ती (फाईल) दिसत नाही ते कागदपत्र इकडे-तिकडे ठेवताना दिसतात.या खात्याच्या चार हजाराच्या सायकलला ते चार चकरा मारायला भाग पाडतात.जातीचा पुरावा म्हणून मुलाचा शाळेचा दाखला हा गुहित धरायला हरकत नसताना टी टाळाटाळ करताना दिसतात.व सामान्य नागरिकांना प्रांताकडे जायला भाग पडतात.ज्या आदिवासी व मागास समाजाच्या विद्यार्थ्यांना जमीन नाही जुमला नाही त्यांच्या कडूनही हे “ति”ची (लाचेची) अपेक्षा ठेवतात.आम्ही शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मोठ्या कष्टाने शाळेत आणतो तर हे त्यांच्या पालकाकडे लगेच जातीचा दाखला मागून खो घालतात.लाभार्थ्यांना थेट अनुदान मिळत नसल्याचा थेट आरोप करून यांना वठणीवर आणण्याची वेळ आल्याचे आ.काळे व गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना सूचित करून कारवाईची मागणी केली आहे.

दरम्यान त्यांनी मनरेगा कडे एवढा पैसे असताना तालुक्यात विकास कामे का होत नाही ? असा सवाल केला आहे.खेड्यातील अनेक रस्ते कुचकामी झाले आहे.त्यावरील खड्डे बुजविण्याची नितांत गरज प्रतिपादन केली आहे.आ.काळे यांनी या योजनेतील अडचणी दूर कराव्या अशी मागणी केली आहे.या योजनेत दोन कि.मी.वृक्ष लागवडीसाठी पंचवीस लाखांची तरतूद असल्याचा खुलासा करत त्यातून हे काम पाच लाखांतही होऊ शकते असे सुचवले आहे.व काम करणारावर लक्ष ठेवण्याची हात जोडून विनंती केली आहे.

त्यावेळी वारीचे माजी सरपंच रावसाहेब टेके यांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळून दलित रस्ते,शिवार रस्ते,प्रत्येक गावात पाच ते दहा कि.मी.असून ते चाळीस मी.मी.खडी टाकून तयार करण्याची सूचना केली व या पावसाळ्यात खराब झालेल्या रस्त्यावर हा निधी खर्च करण्याची मागणी केली आहे.

या वेळी नानासाहेब जवरे यांनी अंजनापूर,बहादरपूर,रांजणगाव देशमुख,मनेगाव,शहापूर,बहादराबाद,देर्डे-कोऱ्हाळे,पोहेगाव,मढी आदी गावांना वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या ओस पांढरी मार्गे रांजणगाव देशमुख-देर्डे-कोऱ्हाळे या मार्गाचे काम स्थानिक विकास निधीतून करून डांबरीकरण करण्याची मागणी केली आहे.व तात्पुरती या मार्गावर खडी-मुरूम टाकून नागरिकांना सुसह्य करावा असा रस्ता करण्याची मागणी केली आहे.हा रास्ता अत्यंत दयनीय झाला आहे.त्याला आ.काळे यांनी दुजोरा दिला आहे.हा रस्ता नियोजनात नसल्याने त्यावर तरतूद करता येत नाही.मात्र ग्रामस्थांच्या मागणी प्रमाणे हा रस्ता आगामी काळात हा नियोजनात घेतला असल्याची माहिती आधीच उपअभियंता उत्तम पवार यांनी दिली आहे.

त्यावेळी आ.काळे यांनीही अधिकारी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांना खडसावले आहे.व या प्रकाराकडे लक्ष ठेवण्याचे व अधिकाऱ्यांना शासन करण्याचे फर्मान काढले आहे.गटविकास अधिकारी सुर्यवंशी यांनी आपण कोपरगावात रुजू झाल्यापासून ३८ लाभार्थ्यांना निधी दिला असल्याचा दावा करून आपण या जागेवर जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करून त्या ठिकाणचा कारभार दुरुस्त करून लाभार्थ्यांचे काम दोन दिवसात मार्गी लावण्याचा प्रयत्न करू असे आश्वासित करून जि. प.सदस्यांनी भ्रमण ध्वनीवर तक्रार केली तरी त्याची आपण दखल घेऊन अशी सारवासारव करण्याचा अनास्था प्रसंग गुदरला आहे.

यावेळी रावसाहेब टेके,सुधाकर होन,सोनाली रोहमारे,हरीश दवंगे,नानासाहेब नेहे,संजय जाधव,भाऊसाहेब भाबड,किशोर जावळे,छगन देवकर,नानासाहेब चौधरी,महंमद तांबोळी,प्रशांत भिसे यांनी विविध प्रश्न मांडले आहे.

या बैठकीचे सुत्रसंचलन माजी नगरसेवक रमेश गवळी यांनी केले तर कर्मवीर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.साडे अकरा वाजता सुरु झालेली हि आढावा बैठक दुपारी दीड वाजता समाप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close