कोपरगाव तालुका
..त्या दरोड्यातील आरोपी केले जेरबंद !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील लोणी ग्रामपंचायत हद्दीतील सुवर्णकार संतोष मधुकर कुलथे यांना दि.०८ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास आपले दुकान बंद करून आपल्या कार द्वारे घरी जात असताना त्यातील दागिने व अन्य चीजवस्तू असा १४ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा अवैज घेऊन दरोडेखोर बेपत्ता झाले होते त्यातील अट्टल दरोडेखोर नवनाथ साहेबराव गोर्डे (वय-३२) रा.सावळीविहिर,अतुल चंद्रकांत आमले,(वय-२४) रा. कर्वेनगर पुणे,सागर गोरख मांजरे (वय-२३) रा.मातापूर ता.श्रीरामपूर,प्रवीण नानासाहेब वाघमारे वय-२४, रा.पिंपळस ता.राहाता सदाशिव टाक.रा.शिरूर (सोने खरेदी घेणारा) आदी पाच आरोपींना लोणी पोलिसांनी शिरूर ता.पुणे या ठिकाणाहून पोलिसानी जेरबंद करून न्यायालयासमोर हजर केले आहे.या गुन्ह्यात दोन अल्पवयीन आरोपी असल्याचे समजते.या सर्वांना न्यायालयाने त्यांना १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या गुह्यातील आरोपी नवनाथ गोर्डे याच्या विरुद्ध शिर्डी कोपरगाव पोलीस ठाण्यात सहा गुन्हे तर अतुल आमले याचे विरुद्ध पुणे शहरात २४ गंभीर गुन्हे तर सागर मांजरे याचे विरुद्ध राहुरी श्रीरामपूर,तोफखाना,एम.आय.डी. सी.नगर आदी ठिकाणी १५ गुन्हे तर प्रवीण वाघमारे याचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.तर गुन्ह्यात अवैध शस्र वापराचे कलम ४/२५ हे वाढविण्यात आले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,लोणी खुर्द ग्रामपंचायत हद्दीत सुवर्णकार संतोष कुलथे यांचे पिंप्री निर्मळ रोडला कुलथे ज्वेलर्स नावाचे दुकान आहे.ते दि.०८ ऑक्टोबर रोजी सांयकाळी ०७ वाजेच्या दरम्यान आपले दुकान बंद करून आपल्या शेवरोलेट या कारने घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांनी आपल्या कार मध्ये दुकानाचा माल ठेऊन ते दुकानांचे कुलूप लावत असताना त्यांच्यावर अज्ञात चार चोरट्यानी पाळत ठेऊन आपल्या बजाज पल्सर दुचाकीवरून येऊन त्या कारमध्ये ठेवलेले दागिने त्यांना कोयत्याचा धाक दाखवून धमकावून त्यांच्या कारमधील सुमारे १४ लाख ५३ हजारांचा अवैज घेऊन पपिंप्री निर्मळ रस्त्याने पोबारा केला होता.या घटनेने हे सुवर्णकार हादरून गेले होते.
या संदर्भात लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.८३७/२०२० भा.द.वि.कलम ३९२,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र या घटननेने पोलिसांपुढे या तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते.या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत सूत्रे हलवून अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांना आदेश देऊन पुढील तपास करण्याचे निर्देश दिले होते.व शिडी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे व लोणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके या कामी नेमले होते.त्यांनी चलचित्र फितीचे निरीक्षण व साक्षिदार यांचे जबाब नोंदवून या कामाला गती देऊन आरोपींचा तपास करण्यास प्रारंभ केला होता.विशेष म्हणजे आरोपीनी हा गुन्हा अतिशय नियोजनबद्ध केल्याचे उघड झाले होते.त्यामुळे या गुन्ह्याचा तपास करणे हे लोणी पोलिसांपुढे मोठे आव्हानच ठरले होते.या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांना एक धागा मिळाला व त्यात सावळीविहिर येथील अट्टल गुन्हेगार नवनाथ गोर्डे हा यात सामील असल्याची माहिती मिळाली होती.व त्याने आपल्या साथीदारांना घेऊन हा डाव साधल्याचे गोपनीय सूत्रांकडून कळले होते.व ते सध्या शिरूर ता .पुणे या ठिकाणी लपून बसल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसानी त्या ठिकाणी आपला सापळा लावला.व ते ज्या ठिकाणी लपले होते तेथे त्यांनी त्यांना झडप घालून पकडले आहे.त्यांनी हा चोरीचा माल शिरूर येथील सदाशिव प्रल्हाद राव टाक वय-४७,रा.खारा मळा, शिरूर जिल्हा पुणे.यांचेकडून गुन्ह्यात चोरलेले २१.७०० कि. ग्रॅ.ची चांदी,किंमत १३ लाख २३ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.या खेरीज या गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर १५० सी.सी.असा १४ लाख ५३ हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.व आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याना १७ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान या गुंह्यातील आरोपी नवनाथ गोर्डे याच्या विरुद्ध शिर्डी कोपरगाव पोलीस ठाण्यात सहा गुन्हे तर अतुल आमले याचे विरुद्ध पुणे शहरात २४ गंभीर गुन्हे तर सागर मांजरे याचे विरुद्ध राहुरी श्रीरामपूर,तोफखाना,एम.आय.डी. सी.नगर आदी ठिकाणी १५ गुन्हे तर प्रवीण वाघमारे याचे विरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून यात दोन अल्पवयीन आरोपींचा समावेश आहे.तर गुन्ह्यात अवैध शस्र वापराचे कलम ४/२५ हे वाढविण्यात आले आहे.
या मोहिमेत आरोपीना जेरबंद करण्यात स.पो.नि.प्रकाश पाटील,पो.स.ई.नानासाहेब सूर्यवंशी,स.पो.नि.मिथुन घुगे,पो.हे.कॉ.राजेंद्र औटी,पो.ना.सुरेश देशमुख,किरण कुऱ्हे, दीपक रोकडे,पो.शि.गजानन गायकवाड,फिरीज पटेल,आप्पासाहेब तमनर,संभाजी कुसाळकर,फुरकान शेख,प्रमोद जाधव, आकाश भैरट आदींनी चोख भूमिका निभावली आहे.