कोपरगाव तालुका
ह.भ. प.अनर्थे महाराजांची उ.म.उपाध्यक्षपदी निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतींनिधी)
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र भोजडे येथील ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे यांची अखिल वारकरी संघाच्या उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड केल्याची माहिती संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. यशवंत महाराज फाले यांनी निवड केल्याचे पत्र नुकतेच दिल्याने अनर्थे महाराज यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथे अनेक वर्षांपासून ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे हे आश्रम चालवता असून ज्ञानदानाचे कार्य त्यांनी सुरु ठेवले आहे.समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी अनेकवर्षापासून सुरु ठेवले असून आपल्या कथाकीर्तनातून त्यानी अनेक अनिष्ट रूढी परंपरावर कठोर हल्ला चढवला आहे.ते अखिल वारकरी संघात कार्यरत असून त्यांच्या कार्याची वरिष्ठ साधू संतांनी दखल घेऊन त्यांच्या कार्याची दखल घेतल्याने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.त्यांच्या निवडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत महाराज फाले,राज्याध्यक्ष मच्छीन्द्र महाराज धानेपकर आदींनी अभिनंदन केले आहे.