कोपरगाव तालुका
संवत्सर हद्दीत घडलेली घटना हि आत्महत्या नव्हे !
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुंबई-नागपूर या राज्यमार्गावरील गोदावरी नदीच्या पुलावरून उडी टाकून शिंगणापूर ग्रामपंचायत हद्दीतील तात्पुरत्या रहिवाशी असलेल्या पदवीधर तरुणीने आपली जीवनयात्रा संपवली असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असली तरी ती आत्महत्या नसून तिने याबाबत एक चिठ्ठी लिहून ठेवल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून यात ईशान्यगडावरील एका माजी लोकप्रतिनिधींच्या जवळच्या नातलग महिलेच्या छळाला कंटाळून हि आत्महत्या केल्याचे उघड झाल्याने या घटनेला वेगळे वळण मिळत असल्याचे दिसत आहे.या घटनेची कोपरगाव शहर पोलिसानी मात्र अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
येवला येथे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या या विद्यार्थिनीने दि.५ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता असल्याची खबर या मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हरवलेल्या नागरिकांच्या वहीत नोंदवली होती.त्या नंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला असता ती संवत्सर येथील पुलाखाली एका खडकाजवळ मृत अवस्थेत सापडली होती.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव नजीक असलेल्या ईशान्य गडावरील महाविद्यालयासमोर “डी” टाइप या बिल्डिंग मध्ये रहिवाशी असलेल्या व येवला येथे अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेली विद्यार्थिनी दि.५ ऑक्टोबर सायंकाळी सहा वाजेपासून बेपत्ता असल्याची खबर या मुलीच्या आईने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात हरवलेल्या नागरिकांच्या वहीत नोंदवली होती.त्या नंतर तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला असता ती मिळून आली नाही.त्यामुळे त्या कुटुंबात भीतीचे वातावरण पसरले होते.शहर पोलिसांनीही या मुलीचा शोध घेऊनही ती सापडत नव्हती.मात्र तिसऱ्या दिवशी सकाळी एक अज्ञात मुलीचे प्रेत संवत्सर या ठिकाणी गोदावरीच्या पुलाखाली मुंबई-नागपूर या ठिकाणी एका मोठ्या खडकाच्या ठिकाणी असल्याची खबर शहर पोलिसांना मिळाल्याने त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता व सदरचे प्रेत वर काढले असता ती मुलगी पोहेगाव येथील मूळ रहिवाशी असल्याचे उघड झाले होते.व नोकरी निमित्त वडील ईशान्यगडावर नोकरी करून आपली उपजीविका चालवत असल्याचे उघड झाले होते. तिच्या नातेवाईकांनी ओळखले असल्याने या मुलीने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.मात्र कोणत्या कारणाने तिने आपली जीवन यात्रा संपवली याचे कारण मात्र गुलदस्त्यात होते.मात्र चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सदर मुलीच्या पंचनाम्यात चिठ्ठी असल्याचे सांगितलें आहे.व त्यात त्या मुलीने आपण आपल्याला घरा नजीकच्या रहिवाशी असलेल्या व माजी लोकप्रतिनिधीशी संबंधित एका महिलेने कायम छळले होते व तिच्या त्रासाला कंटाळून आपण आपली जीवन यात्रा संपवत असल्याचे म्हटले असल्याची चर्चा नजीकच्या परिसरात सुरु आहे.त्या बाबत या विद्यार्थिनीच्या नातेवाईकांना कल्पना दिली आहे.मात्र आपली रोजीरोटी व आपल्याला मोठ्या राजकीय पार्श्वभूमी असललेल्या नेत्यांशी भांडणे हि बाब आपल्या आवाक्यात नसल्याचे हे कुटुंब समजत असल्याने ते स्वतः यात उघड विरोध करायला तयार नाही.त्यामुळे आता कोपरगाव शहर पोलीस व हे कुटुंबीय या विद्यार्थिनीला न्याय देण्यासाठी कोणती भूमिका घेतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.या घटनेने शिंगणापूर परिसरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या प्रकरणी अकस्मात मृत्यू नोंदणी पुस्तकात सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी हे करीत आहेत.