जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

हातगाडी मालकांना वेळ वाढवून द्या-सेना शहराध्यक्ष

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्य सरकारने नुकतीच राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना आपले व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे.मात्र त्यात रस्त्यावर आपला व्यवसाय करून आपला प्रपंच सावरणाऱ्या हातगाडी व्यावसायिकांना मात्र व्यवसाय करण्यास परवानगी नाकारली असल्याने हा त्यांच्यावर सरळसरळ अन्याय असल्याने राज्य सरकारने या घटकांना त्वरित न्याय द्यावा अशी महत्वपूर्ण मागणी शिवसेनेचे शहराध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी कोपरगावचे तहसीलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान या बाबत आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा.सदाशिव लोखंडे यांचेशी संपर्क साधला असून त्याना या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे.त्यांनी आपण या प्रश्नी जिल्हाधिकारी यांना या विषयी अवगत करून या प्रश्नाला वाचा फोडू असे आश्वासन दिले आहे-कलविंदर दडियाल,शहराध्यक्ष,कोपरगाव शहर शिवसेना

कोरोना साथीची पहिली टाळेबंदी २२ मार्च रोजी सुरु झाली होती.मार्च पासून राज्यात हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार बंद होते त्यामुळे राज्यातील बरेच अर्थकारण कोलमडले होते.पण आता राज्य सरकारने ते पुन्हा सुरु करण्याची नुकतीच परवानगी दिली आहे.राज्य सरकारने सांगितलेल्या नियम आणि अटींचे पालन करून हॉटेल,रेस्टॉरंट आणि बार पुन्हा सुरु केले आहे.५० टक्के क्षमतेवर हॉटेल्स,फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.म्हणजे एकावेळी एकूण क्षमतेच्या अर्धे लोक हॉटेल्स हॉटेल्स मध्ये जेवू शकणार आहेत.असे करत असताना सामाजिक अंतर ठेवणे,थर्मल स्क्रीनिंग करणे आणि प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करणे आवश्यक केले आहे.मात्र यात रस्त्यावर आपला खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या हॉकर्स,हातगाडी मालक यांना मात्र शासनाने आपल्या आदेशात कुठलाही उल्लेख केला नाही त्यामुळे सरकारी अधिकारी यांनी त्यांना प्रतिबंध घातला आहे.त्यामुळे या व्यासायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे.त्यामुळे या नागरिकांना सरकारने सापत्नपणाची वागणूक देऊ नये.या साठी शिवसेनेचे कोपरंगाव शहर अध्यक्ष कलविंदर दडियाल यांनी लक्ष वेधून घेतले आहे.व त्या साठी आज कोपरगाव तहसीलदार यांना या व्यावसायिकांच्या मागण्याचे निवेदन दिले आहे.व त्यात आगामी काळात दसरा-दिवाळी आदी मोठे सण आल्याने त्यांचा व्यवसाय झाला नाही तर त्यांना उपासमारीची वेळ येईल त्यामुळे शासनाने या आदेशात बदल करून या उपेक्षित घटकांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे.हे व्यावसायिक नवीन अटी शर्ती मान्य करायला तयार असल्याचेही त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

निवेदनावर शहर शिवसेनेचे उपाध्यक्ष आकाश कानडे,गगन हाडा,भूषण पाटणकर,प्रफुल्ल शिंगाडे,विशाल झावरे,योगेश मोरे,गोपाळ वैरागळ,शैलेश वाघ,राहुल साटोटे, विजय शिंदे,गणेश झावरे,अंबादास वाघ,विकास शर्मा,नितीन राऊत,व इतर हॉकर्स हजर होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close