कोपरगाव तालुकासामाजिक उपक्रम
लोहगावात मुखपट्ट्यांचे गरजूंना वाटप
जनशक्ती न्यूजसेवा
लोहगाव-(वार्ताहर)
राहता तालुक्यातील लोहगाव येथील कै. कुडलिक किसनराव चेचरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त गावातील गरजू कुटुंबांना मास्कचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोना पासून बचाव होण्यासाठी मास्कचे वापर प्रभावीपणे ठरत आहे.आज ती काळाची गरज आहे व गरज बनलेली आहे त्यानिमित्ताने अड.चेचरे यांनी हा सामाजिक उपक्रम राबविला आहे.
कोरोना पासून बचाव होण्यासाठी मास्कचे वापर प्रभावीपणे ठरत आहे.आज ती काळाची गरज आहे व गरज बनलेली आहे त्यानिमित्ताने कै कुंडलिक किसनराव चेचरे यांच्या २१ व्या पुण्यस्मरणानिमित्त लक्ष्मी ग्रामीण पतसंस्थेचे संस्थापक ऍड.बाबासाहेब चेचरे यांच्या संकल्पनेतून गावातील गरजू कुटुंबियांना एन. ९५ ह्या मास्क चे वाटप करण्यात आले आहे. गावातील ग्रामपंचायत कर्मचारी व लोहगाव प्रवरानगर परिसरातील बँकांचे कर्मचारी व गरजू लोकांना मास्कचे वाटप करण्यात आले त्यांच्या या उपक्रमाबद्दल गावात सर्वत्र कौतुक होत आहे .अनावश्यक खर्च टाळून गरजूंना मास्कचे वाटप केल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.