जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मराठा आरक्षणासाठी कोपरगावात निवेदन

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तहसील कार्यालय येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी करण्यात आलेल्या आंदोलनात आ. आशुतोष काळे सहभागी झाले तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार योगेश चंद्रे यांना देण्यात आले आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही त्यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे.

मराठा आरक्षण कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली. मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. घटनापीठाच्या सुनावणी दरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नाही.मराठा आरक्षणा अंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. घटनापीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.त्यामुळे राज्यातील मराठा समाज अस्वस्थ झाला आहे.मराठा क्रांती मोर्चाने या बाबत आवाज उठविण्यास प्रारंभ केला असून राज्यात आंदोलने,मोर्चा आदींच्या माध्यमातून सरकारवर दबाव वाढविण्यास प्रारंभ केला आहे.त्याचाच भाग म्हणून आज सकाळी अकरा वाजता तहसीलदार कोपरगाव यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शिवसेना शहराध्यक्ष कलविंदर डडियाल,भरत मोरे,अशोक आव्हाटे, बाळासाहेब रुईकर,राजेंद्र वाकचौरे,राजेंद्र आभाळे, अनिरुद्ध काळे,तुषार सरोदे,विनय भगत,अमित आढाव, दिनेश पवार,रमेश कुहिरे,गणेश पवार, नितीन शेलार, शुभम लासुरे,किशोर डोखे, लवेश शेलार, प्रतीक पाटील, सुनील साळुंके,अमोल शेलार,दादा आवारे,ओम मोरे, रवींद्र कथले,लक्ष्मण सताळे, गिरीधर पवार,डॉ.शिवाजी रोकडे, उमेश देवकर व मराठा समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Close