जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

चांदेकसारे-डाऊच खुर्द शिव रस्त्याची दुर्दशा !

जाहिरात-9423439946
जनशक्ती न्यूजसेवा

धारणगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचे काम पावसामुळे बंद तसेच मंदगतीने सुरू होते परंतु आता पावसाने उघड दिल्याने पुन्हा सुरू झाले असुन वहातुकीसाठी कंपनी शिव रस्तेचा वापर करीत आहे.

या रस्त्या बाबत तक्रार केली असता सबंधित अधिकारी लहान खड्डे ची तात्पुरती डागडुजी करून शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत तसेच शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे.

या पाश्र्वभूमीवर चांदेकसारे ते डाउच रस्त्यावर कंपनीच्या अवजड वाहनांच्या वर्दळीने प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहे. या भागातील शेतकरी आजच्या घडीला शेतातील धान्य, सोयायबीन,मका,बाजरी इत्यादी पिकांची काढणी करत असुन शेतातील काढलेला मालाची वहातुक करण्यासाठी व दैनंदिन दळणवळणासाठी या शिवरस्त्याचा वापर होत आहे. अशा परिस्थितीत रस्ता खराब झाला असुन मोठे खड्डे पडले असल्याने शिवार वहातुक करताना शेतकऱ्याचे खुपच हाल होत आहे. बऱ्याच वेळा दुचाकीस्वारांचा अपघात होउन गंभीर दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच उन्हाळ्यात वहानांच्या वर्दळीने उडणाऱ्या धुळीमुळे परीसरातील वातावरणात प्रदुषीत होत असुन त्यामुळे श्वसनाचे विकार होण्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

या बाबतीत तक्रार केली असता सबंधित अधिकारी लहान खड्डे ची तात्पुरती डागडुजी करून शेतकऱ्याची दिशाभूल करत आहेत तसेच शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याची माहीती परीसरातील शेतकऱ्यांनी आमचा प्रतिनिधीस दिली आहे.
आज दुपारी कंपनी चे हायवा डंपर खडी ची वाहतूक करीत असताना शिवरस्त्याच्यावरील शेतात घुसल्याने या परीसरातील शेतकरी संतप्त झाले असुन कंपनीने रस्त्यांची कायमस्वरूपी ची दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे.

Related Articles

Close