कोपरगाव तालुका
कोपरगाव पालिकेत गांधी जयंती उत्साहात साजरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या कार्यालयात महात्मा गांधी जयंती आज सकाळी उत्साहात साजरी करण्यात आली असून महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले आहे.
गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.
गांधी जयंती हा महात्मा गांधी यांचा जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो.गांधी जयंती ही भारताच्या तीन राष्ट्रीय दिनांपैकी एक आहे. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.संयुक्त राष्ट्रसंघाने हा दिवस जागतिक अहिंसा दिन म्हणून स्वीकारला आहे.कोपरगाव नगरपरिषदेने आज गांधी जयंती उत्साहात साजरी केली आहे.त्यावेळी राष्ट्र पिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी मारुती काटे,गंगाधर चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.त्यावेळी या महापुरुषांच्या विचारांचे सम्रान करण्यात आले आहे.व त्याना अभिवादन करण्यात आले आहे.