कोपरगाव तालुका
चंदनाच्या झाडाची चोरी,गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात धारणगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जमिनीत ग.नं.१२४ मध्ये दि.२२ सप्टेंबरच्या रात्री अज्ञात इसमाने आपल्या फायद्यासाठी सुमारे पाच हजार रुपये किमतीची चंदनाची दोन झाडे चोरून नेली असल्याची फिर्याद त्याच गावातील शेतकरी त्र्यंबक भागूजी देवकर (वय-७०) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने धारणगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात चंदनाच्या झाडाला चांगली किंमत येत असल्याने चोरट्यांचे लक्ष या किमती झाडाकडे गेले आहे.अशीच घटना धारणगाव शिवारात घडली असून वरील क्रमांकाच्या गट क्रमांकाच्या क्षेत्रात चोरट्यानी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत स्वतःच्या फायद्यासाठी लाबाडीने ती रातोरात कापून नेली आहे त्यामुळे नजीकच्या शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
कोपरगाव तालुक्यात चंदनाच्या झाडाला चांगली किंमत येत असल्याने चोरट्यांचे लक्ष या किमती झाडाकडे गेले आहे.अशीच घटना धारणगाव शिवारात घडली असून वरील क्रमांकाच्या गट क्रमांकाच्या क्षेत्रात चोरट्यानी रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत स्वतःच्या फायद्यासाठी लाबाडीने ती रातोरात कापून नेली आहे.हि बाब संबंधित शेतकऱ्याच्या दुसऱ्या दिवशी लक्षात आली त्यावेळी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे.
या बाबत शेतकरी त्र्यंबक देवकर यांनी तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.नं.४८७/२०२० भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एम.ए.आंधळे हे करीत आहेत.