
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा २९ हजार ०१७ वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत ४३५ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील गत तीन दिवसातील तीन रुग्ण धरून २३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत काही दिवसात अनेक प्रमुख मान्यवरांसह एक आरोग्य कर्मचाऱ्यास आपले प्राण गमवावे लागले आहे. सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद वाढत चालली आहे.त्यामुळे नागरिकांची चिंता वाढत चालली आहे.
आज आलेल्या यादीत शहरात बाधित रुग्णांची संख्या २८ तर ग्रामीण भागात १८ असे ४६ रुग्ण बाधित निघाले असून यात खाजगी प्रयोग शाळेतील रुग्ण या वेळी आढळले नाही तरी एकूण रुग्ण संख्या पाहता नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आज कोपरगाव शहरात आढळलेल्या उर्वरित बाधित रुग्णांची यादी पुढील प्रमाणे वाणी सोसायटी एक पुरुष वय-४८,एक महिला वय-४५, बिरोबा चौक एक पुरुष वय-३१, येवला नाका एकु पूरुष वय-४० एक महिला वय-३५,धारणगाव रोड एक महिला वय-३५,महादेव नगर एक पुरुष वय-५४ तर दोन महिला वय-४५,४३,समतानगर दोन पुरुष वय-३७,४३,अंबिका चौक एक पुरुष वय-४८,एक महिला वय-३८,खडकी एक महिला वय-५२, गांधीनगर एक पुरुष वय-६०, शिंदे-शिंगी नगर एक पुरुष वय-२३,वडांगळे वस्ती एक महिला वय-२९,सबजेल तहसील कोपरगाव ९ पुरुष वय-३१,२२,३५,२३,२२,३०,३५,२५,२१ आदींचा समावेश आहे.तर गारदा नाला एक पुरुष वय-६० तर लक्ष्मीनगर येथील एक पुरुष वय-२० आदी २८ रुग्णांचा समावेश आहे.
तर ग्रामीण भागातील १८ रुग्ण पुढील प्रमाणे खिर्डी गणेश दोन पुरुष वय-५०,३८,एक महिला वय-३५ बक्तरपूर तीन पुरुष वय-३८,४५,१५,तीन महिला वय-५५,३०,४५ तर उक्कडगाव येथील चार पुरुष वय-७२,२४,१४,११,तर दोन महिला वय-१२,३२,कोकमठाण एक पुरुष वय-६७,कोळापेवाडी एक वय-५०,धामोरी एक पुरुष वय-३४ आदी एकूण १८ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या १२९९ इतकी झाली आहे.त्यात १४८ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज पर्यंत २३ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.७७ टक्के आहे.आतापर्यंत ०५ हजार ३९३ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला २१ हजार ३७२ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २४.०६ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ११२८ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ८६.८३ टक्के झाला आहे.दरम्यान या विक्रमी बाधित आकडेवारीमुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली असली तरी मात्र नागरिकांनी आगामी काळात प्रतिबंधात्मक उपायाबाबत अजून दक्षता घेतल्यास रुग्ण वाढ रोखता येईल असा विश्वास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते यांनी शेवटी म्हटले आहे.