कोपरगाव तालुका
कोपरगावात तरुणांची आत्महत्या
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात आज सकाळी ७.३० वाजेच्या पुर्वी सुभाषनगर येथील तरुण वाल्मिक दगडू आवारे (वय-३४) या तरुणाने अज्ञात गोदावरी नदी पात्रात दत्त पाराजवळ अज्ञात कारणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली असल्याची माहिती मयताचे वडील दगडू दौलत आवारे (वय-५७) यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
मयताच्या पच्छात आई,वडील,पत्नी,भाऊ,तीन मुली,एक मुलगा आदी परिवार आहे.मयत नगरपरिषदेत काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागात कर्तव्यावर होता.त्या मुळे नगरपरिषदेत कामावर असलेल्या कर्मचाऱ्याचा हा सलग आठ महिन्यात तिसरा मृत्यू ठरला आहे.मयत दोन दिवसा पुर्वी पासून गायब होता.तो आज सकाळी मृतावस्थेत आढळला असून मयताचे शव छिन्न-विच्छिन्न अवस्थेत मिळून आला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.या कर्मचाऱ्याच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यु रजि.३८/२०१९,सि.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच. गायमुखे करत आहेत.