कृषी विभाग
अति पावसामुळे नुकसानीचे पंचनामे करा-सूचना
जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर-(प्रतिनिधी)
जाफ्राबाद -नायगाव पाझर तलाव काठोकाठ भरल्याने ज्या जमिनी अधिग्रहीत केलेल्या नव्हत्या अशा शेकडो एकर क्षेत्रामध्ये पाणी साठल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याही नुकसानीच्या पंचनामे करा-आ.कानडे
वर्तमानात परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे.या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावामध्ये शेती मध्ये पाणी साचल्याने पिके सडून जाण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.हातातोडाशी आलेले स्वायाबीन,कपाशी,भुईमुग,कांद्याची रोपे बाजरी सारखे पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
या पार्श्वभूमीवर आ. लहू कानडे यांनी बुधवारी प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांना प्रत्यक्ष गावोगाव भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना केली आहे.तसेच जेथे आधिक नुकसान झाले.तेथे शेती पिकाचे पंचनामे करण्याचे सांगितले होते.जाफ्राबाद -नायगाव पाझर तलाव काठोकाठ भरल्याने ज्या जमिनी अधिग्रहीत केलेल्या नव्हत्या अशा शेकडो एकर क्षेत्रामध्ये पाणी साठल्याने तेथे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.याही नुकसानीच्या पंचनामे करण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या होत्या.त्यानुसार महसुल विभागाने लेखी आदेश काढून सर्व तलाठ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहे.