जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

दरोड्याच्या तयारीत असलेले तीन जण जेरबंद,एक फरार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील नागपूर-मुंबई महामार्गावर असलेल्या संवत्सर हद्दीतील पढेगाव फाट्यानजिक काही इसम रस्ता लूट करत असल्याची गुप्त खबर मिळाल्यावरुन तेथे पाठवलेल्या पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे व त्यांच्या पथकातील पोलिसानी दारोड्याच्या तयारीत असलेल्या तुषार उर्फ गोकुळ राजेंद्र दुशिंग वय-२४ रा.टिळकनगर,नकुल धर्मराज ठाकरे वय-२० रा.साईनगर,अक्षय आप्पासाहेब जाधव वय-२३ रा.गांधीनगर आदी तीन आरोपीना कोयता,चाकु,लाकडी दांडके,दोरखंड आदी धोकादायक हत्यारांसह जेरबंद केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.या आरोपी विरुद्ध कोपरंगाव शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

संवत्सर चौफुलीवरून पुढे असलेल्या पढेगाव फाट्या नजीक ४-५ इसम गाड्या अडवून लूटमार करत असल्याची बातमी देऊन त्या ठिकाणी ताबडतोब खात्री करून घ्यावी असे आदेश दिल्याने या गस्ती पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनीं आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला असता त्या ठिकाणी रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाच्या प्रकाश झोतात त्यांना काही लोक दोन दुचाकींजवळ उभे असल्याचे आढळले.त्यांनी आपली गाडी रस्त्याचे बाजूला लावून घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी उभ्या असलेल्या काही इसमानी आरडा-ओरडा करण्यास व आपल्या ताब्यातील गाड्या तर काहींनी पायी पळण्यास कसोशीने सुरुवात केली.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,मुंबई-नागपूर हा रस्ता नादुरुस्त असल्याने त्याचा गैरफायदा घेऊन या मार्गावर सातत्याने वाहनांची अडवून काही दरोडेखोर कायम लूटमार करत असतात.मात्र अलीकडील काळात यात कमी आलेली असताना काल रात्री कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भरत नागरे,व त्यांचे सहकारी पो.हे.कॉ.दिलीप तिकोणे,पोलीस नाईक बाबासाहेब कोरेकर,पो.कॉ.मनोज काटे,प्रकाश नवाळी,आदी कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड या राज्य मार्गावर अधिग्रहित वाहानाने गस्त घालत असताना त्याना सायंकाळी ७.५४ वाजेच्या सुमारास त्याना पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांचा या गस्ती पथकाला दूरध्वनी आला व त्यांनी संवत्सर हद्दीत संवत्सर चौफुलीवरून पुढे असलेल्या पढेगाव फाट्या नजीक ४-५ इसम गाड्या अडवून लूटमार करत असल्याची बातमी देऊन त्या ठिकाणी ताबडतोब खात्री करून घ्यावी असे आदेश दिल्याने या गस्ती पथकातील पोलिस अधिकाऱ्यांनीं आपला मोर्चा त्या ठिकाणी वळवला असता त्या ठिकाणी रात्री येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाच्या प्रकाश झोतात त्यांना काही लोक दोन दुचाकींजवळ उभे असल्याचे आढळले.त्यांनी आपली गाडी रस्त्याचे बाजूला लावून घटनास्थळी धाव घेतली असता त्या ठिकाणी उभ्या असलेल्या काही इसमानी आरडा-ओरडा करण्यास व आपल्या ताब्यातील गाड्या तर काहींनी पायी पळण्यास कसोशीने सुरुवात केली.त्यांच्या कडील काही हत्यारे रोडवर व इतर ठिकाणी विखरून पडली व त्यानीं पाठलाग करणाऱ्या पोलिसांशी झटापट सुरु केली.त्यांना पोलिसांनी मोठ्या कसोशीने ताब्यात आणले.दरम्यान त्यांच्याकडील सामानाची पंचाच्या साक्षीने झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे एक ४.३,८.३,लांबीचे चाकू,काळ्या रंगाची तुषार दुशिंग याच्या ताब्यातील बजाज पल्सर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ वाय.६२८०),नकुल ठाकरे याच्या ताब्यातील एक लाकडी मुठीचा ७.५ इंच लांबीचा कोयता,एक दुसरी काळ्या रंगाची बजाज पल्सर दुचाकी (क्रं.एम.एच.१७ बी.पी.३५३४),दोन लाकडी दांडे सुमारे ३० व २८ इंची लांबीचे,एक २८ इंच लांबीचा गज,एक सफेद रंगाचे १३ फूट लांबीचे दोरखंड,असा ८० हजार १५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.दरम्यान पळून गेलेल्या इसमाचे या आरोपींना नाव विचारले असता त्यांनी करण मोरे रा.रामवाडी संवत्सर असे सांगितले आहे.यातील एक आरोपी नकुल ठाकरे हा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी आदेश क्रमांक १२/२०१९ अन्वये दोन वर्षा करिता हद्दपार केलेला असताना जिल्हा हद्दीत बेकायदा प्रवेश करून दरोड्याचा प्रयत्न करताना मिळून आला आहे.त्यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी या आरोपी विरुद्ध गु.र.न.७१०/२०२० भा.द.वि.कलम ३९९,४०२,मु.का.कलम १४२ प्रमाणे या गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close