कोपरगाव तालुका
टाकळी बंधारा फुटला,शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंधाऱ्यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले असल्याची दुर्घटना घडली आहे.झालेल्या घटनेची माहिती मिळताच आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिल्या आहेत.
कोपरगाव तालुक्यातील टाकळी साठवण बंधाऱ्याचा भराव वाहून फुटल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.बंधाऱ्याचा भराव फुटल्याने या बंधाऱ्यातील पाणी कमी करून होणारे नुकसान कमीत व्हावे यासाठी या बंधाऱ्याचे लोखंडी गेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र लोखंडी गेट उघडले गेले नाही.त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.
गुरुवार दि.१७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास टाकळी येथील दगडी साठा बंधारा फुटल्यामुळे बंधाऱ्यालगत असलेल्या शेतात पाणी शिरून बाजरी, सोयाबीन,मका आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होवून कांदा चाळीत पाणी शिरल्यामुळे कांद्याचे देखील नुकसान झाले आहे.चालू वर्षी जून महिन्यापासून पाऊस पडत आहे.कोपरगाव तालुक्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे शेतातील पिके पिवळी पडत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहे.अशा परिस्थितीतून शेतकरी जात असतांना टाकळी साठवण बंधाऱ्याचा भराव वाहून फुटल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे.बंधाऱ्याचा भराव फुटल्याने या बंधाऱ्यातील पाणी कमी करून होणारे नुकसान कमीत व्हावे यासाठी या बंधाऱ्याचे लोखंडी गेट उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र लोखंडी गेट उघडले गेले नाही.त्यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करावे व भविष्यात या बंधाऱ्यात पाणी साठले जावे यासाठी या बंधाऱ्याची तातडीने दुरुस्ती करा अशा सूचना आ. काळे यांनी केल्या आहेत.
यावेळी सभापती पौर्णिमाताई जगधने,कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने,गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,उपअभियंता उत्तम पवार,भाऊसाहेब देवकर,छगनराव देवकर,धनंजय देवकर,शशिकांत देवकर,गणेश पळसकर,बाबासाहेब जगताप,बाळासाहेब देवकर,राजेंद्र देवकर,रामा गायकवाड,गोरख देवकर,सुरेश पाईक,हरिभाऊ देवकर,यशवंत देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.