निधन वार्ता
माजी सभापती टेके यांना मातृशोक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके याच्या मातोश्री गं.भा.वत्सलाबाई सावळेराम टेके (वय-९१) यांचे सोमवारी दि.१८ जुलै रोजी रात्री ९:३८ वाजता वृद्धाकाळाने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली असा परिवार आहे.
स्व.वत्सलाबाई टेके या अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या म्हणून प्रसिद्ध होत्या.त्यांचा अंत्यविधी मंगळवारी दि. १९ सकाळी १०:३० वाजता वारी येथील गोदावरीतीरी शोकाकुल वातावरणात संपन्न झाला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.