गुन्हे विषयक
सोयरिकीच्या नादात घडवला गुन्हा,हकनाक बळी !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील काकडी (शिर्डी) विमानतळाला लागून दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर ५ एप्रिल रोजी पहाटे झालेल्या हल्ल्यातील आरोपी नगर पोलिसांनी आरोपींना अटक केली असताना या घटनेत,” तुमच्या तरुण मुलास सोयरिक शोधून देतो” या बहाण्याने आरोपींनी जखमी महिलेशी जवळीक निर्माण करून घरातील ऐवजाचा शोध घेऊन हा गुन्हा घडवला असल्याची माहिती समोर आली आहे मात्र हा भाबडेपणा दोन जीवांना घेऊन गेल्याने सर्वत्र हळहळ आणि या आरोपींविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान काल सकाळी १० वाजता काकडी ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते.त्यात ग्रामस्थांनी या क्रूर घटनेचा निषेध केलाय.पण काकडी गावातील परप्रांतीय मजुरांची गावात पोलिसांचे पडताळणी असल्याशिवाय त्यांना गावात काम करू द्यायचे नाही असा ठराव केला असल्याची माहिती मिळाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील काकडी विमानतळाच्या दक्षिण बाजूस असलेल्या भोसले वस्तीवर दिनांक ०५ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास काही चोरट्यांनी पाळत ठेऊन साहेबराव पोपट भोसले यांच्या वस्तीवर सशस्त्र हल्ला चढवला होता.त्यात ते स्वतः सह त्यांचा मुलगा कृष्णा साहेबराव भोसले (वय ३२) हे जागीच ठार झाले असल्याचे दिसून आले आहे.तर त्यांची पत्नी साखरबाई भोसले या गंभीर जखमी झाल्या होत्या.तर त्यांची वृद्ध,अंध आई आश्चर्यकारक बचावल्या होत्या.ही बाब दूध घालण्यास वेळेवर येणारे भोसले कुटुंब आज का आले नाही याचा शोध घेतल्यावर दूध संस्थाचालक यांचेकडून उघड झाली होती.त्यामुळे नगर पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले होते.त्यामुळे घटनास्थळी पोलिस अधीक्षक राकेश ओला,श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्मे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने,राहाता पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण आदींनी घटनास्थळी तातडीने हालचाल केली होती व आरोपींचा शोध सुरू केला होता.त्यावेळी सिन्नर तालुक्यातील पळसे येथील टोल नाक्यावरील चोरीच्या दुचाकीने फरार होत असताना त्यांना बारा तासांच्या आत अटक केली होती.त्यानंतर त्यांना रविवार असताना कोपरगाव येथील न्यायदंडाधिकारी स्मिता बनसोड यांचेसमोर हजर करून त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असताना आता यातील अनेक कंगोरे समोर येत आहे.

दरम्यान सदर साखरबाई भोसले यांची प्रकृती अत्यवस्थ असून आज दिवसभरात त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांना डॉक्टरच्या सल्ल्याने भेटून गेले असल्याचे समजत आहे.
यात आरोपींची ओळख ही मुलगी आणि जावई यांनी मजुरांची टंचाई असल्याने हे मजूर मका कुट्टीच्या निमित्ताने नांदूर या ठिकाणाहून पाठवून दिले होते.त्या निमित्ताने झालेली ओळख पुढे या आरोपींनी भोसले यांच्या घरातील तरुण वीणालग्नाचा आहे हे दुर्बलस्थळ बरोबर हेरले आणि आपली जादू सुरू केली होती.आमच्या भागात मुली आहे”आम्ही तुम्हाला लग्न जमवून देतो तुम्ही काहीही काळजी करू नका” असे आश्वासन देऊन त्यांनी या भोसले यांच्या घराच्या भोवती आपले मायाजाल विणले होते.विशेषतः जखमी महिलेच्या भोळ्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन त्यांनी गोड गोड बोलून त्यांना भावी वाधुसाठी लग्नास दागिने बनवायला लावले होते.सदर दागिने बनवले होते.अधिक दोन्ही मुलींचे दागिने याच भोसले कुटुंबाकडे सांभाळण्यास होते.हा सर्व ऐवज जवळपास तीस तोळे इतके होता.त्यामुळे या दागिन्यांवर या चोरट्यांनी नजर न गेली तर नवल ! आरोपींना या दागिण्यामुळे झोप येत नव्हती.त्यांनी या कुटुंबाकडे काही ना काही निमित्ताने जवळील वाढवली होती.विशेषतः तरुण मुलगा कृष्णा भोसले आणि त्याचा पिता साहेबराव भोसले हे घरी नसले की ते पाणी पिण्याची संधी साधून घरी येण्याची संधी साधून घरातील सर्व बितंबातमी काढत होते.सदर जखमी महिला साखरबाई घटना घडली त्यांच्या आदल्या दिवशी याच घटनेची पुनरावृत्ती घडली होती.त्याच्या आदल्या दिवशी तर मुलाचा मामा दिघे हे घरी आल्याने त्यांना जास्त संवाद साधता आला नाही.विशेषतः त्याच दिवशी त्यांनी डाव साधला असता असे नागरिकांत बोलले जात आहे.त्यामुळे अखेर वैतागून त्यांनी रात्रीची वेळ निवडून आपले ध्येय साध्य केले असल्याचे उघड होत आहे.त्यासाठी घराच्या मागे त्यांनी आधी दारू पिऊन मग आपला डाव साध्य केला असल्याचे समजत आहे.गाय व्याल्ली असल्याने तरुण कृष्णा भोसले हा बाहेर झोपला होता.त्याचा आधी त्यांच्याच शेतातील फावड्याने व फवड्याचे दांड्याने डोक्यावर घाव घालून त्याचा आवाज होऊ नये म्हणून कपड्याने तोंड दाबून त्यास ठार केले असल्याची माहिती हाती आली आहे.तर त्यानंतर तो निपचित पडला असल्याची खात्री झाल्यावर त्यानी आपला मोर्चा घरातील वडील साहेबराव भोसले आणि आई साखरबाई भोसले यांचे कडेवळवला होता.त्याच फावड्याने दुसऱ्या पावड्याच्या दांड्याने त्यांनाही निपचित केले होते.त्यानंतर घरातील सर्व वस्तूंची उचकापाचक करून सोन्याचे दागिन्यांचा शोध घेतला मात्र शेवटी त्यांना मिळालेल्या अंदाजाने त्यांनी मिरची वाटण्याचा पाट्याचे मागील भिंतीत ठेवलेल्या दागिन्यांवर डल्ला मारून धूम ठोकली आहे.जाताना त्यांनी आपले गुन्ह्यात वापरलेले फावडे व त्याचा दांडा मयताच्या तलावात फेकून देऊन पोबारा केला आहे.त्यांनंतर म्हसोबा रस्त्याने दक्षिणेस असलेल्या कासारे गावाकडे जावून नांदूर रस्ता पकडला असल्याचे दिसत आहे.कारण काही शेतकऱ्यांनी पहाटेच्या वेळी दुचाकी गेल्याचे सांगितले आहे.तेथून सिन्नर गाठून त्या ठिकाणी त्यांनी सोनाराच्या दुकानात पायधूळ झाडून सदर सोने विकण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती आहे.मात्र त्या ठिकाणी यांचा प्रयत्न फसल्याने त्यानी नाशिककडे प्रयाण केले होते.मात्र सोनाराच्या दुकानात त्यांनी सदर चोरी केलेला मोबाईल सुरू केल्याने गडबड झाली आणि पोलिसांना ते ट्रॅक झाले होते.लागलीच नगर पोलिसांनी सिन्नर पोलिसांची मदत घेऊन त्यांना लागलीच पाठपुरावा करून गजाआड केले आहे.आज राहाता पोलिस ठाण्यात आरोपींची ओळख परेड घेण्यात आलेली आसल्याची माहिती पुढे आली आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलिस उपविभागीय अधिकारी शिरीष वमने हे करत आहेत.
दरम्यान सदर साखरबाई भोसले यांची प्रकृती अत्यवस्थ असून आज दिवसभरात त्यांचे जवळचे नातेवाईक त्यांना डॉक्टरच्या सल्ल्याने भेटून गेले असल्याचे समजत आहे.त्यामुळे त्या अखेरच्या घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांचे नातेवाईक आणि ग्रामस्थांची चिंता वाढली आहे.
दरम्यान काल सकाळी १० वाजता काकडी ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी सरपंच पूर्वा रवींद्र गुंजाळ यांचे अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन केले होते.त्यात ग्रामस्थांनी या क्रूर घटनेचा निषेध केलाय.पण काकडी गावातील परप्रांतीय मजुरांची गावात पोलिसांचे पडताळणी असल्याशिवाय त्यांना गावात काम करू द्यायचे नाही असा ठराव केला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.