कोपरगाव तालुका
सुनीता इंगळे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपालिका हद्दीतील शाळा क्र.६ येथील उपक्रमशील शिक्षिका सुनिता इंगळे यांना महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या दिवशी जाहीर करण्यात आला आहे.त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सुनीता इंगळे यांनी अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर,विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,बालरक्षक म्हणून भूमिका,कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना त्या़नी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविलेले आॅनलाईन टेस्ट निर्मिती,भाषिक खेळ व जोडाक्षरे पीडीएफ निर्मिती,शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती व विविध उपक्रम, सन २०११ पासून टाकाऊ साहित्यातून टिकाऊ साहित्य निर्मितीत संपूर्ण राज्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे.
शिक्षक दिनी न.पा. व म.न.पा. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जून कोळी व राज्यसचिव अरुण पवार यांनी राज्यातील शाळांसाठी व शिक्षकांसाठी ‘आदर्श शाळा व आदर्श शिक्षक’ पुरस्कार जाहीर केले आहेत.कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.दरम्यान ग्लोबल बंजारा फाऊंडेशन चाळीसगाव जि.जळगाव यांच्यातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय ‘आधुनिक सावित्रीबाई फुले पुरस्कार’हि सुनिता इंगळे यांना जाहिर करण्यात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
विद्यार्थी विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम,कृतियुक्त अध्यापन,विद्यार्थ्यांची मंगळग्रहावर नोंदणी,अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर,विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत,बालरक्षक म्हणून भूमिका,कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना त्या़नी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी राबविलेले आॅनलाईन टेस्ट निर्मिती,भाषिक खेळ व जोडाक्षरे पीडीएफ निर्मिती,शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती व विविध उपक्रम, सन २०११ पासून टाकाऊ साहित्यातून टिकाऊ साहित्य निर्मितीत संपूर्ण राज्यात एक वेगळा ठसा उमटवला आहे.साहित्य क्षेत्रातील कामगिरी लाॅकडाऊन काळातील विद्यार्थ्यांसाठी ‘शालेय परीपाठ प्रश्नमंजूषा’ पुस्तकाची निर्मिती या सर्व निकषांवरून सुनिता इंगळे यांना हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे.