कोपरगाव तालुका
कोपरगावातील परतीचा पाऊस,नुकसानीचे पंचनामे करा-मागणी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस कोसळत असून या पावसाने काल मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नुकसानग्रस्त पूर्व व नैऋत्येकडे सर्व गावातील शेतकऱ्यांचे पंचनामे करावे शि मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी कोपरगावचे तहसीलदार यांचेकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
तालुक्याच्या पूर्वभागातील पढेगांव,करंजी,संवत्सर,कासली,शिरसगांव,तळेगावमळे,उक्कडगांव,आपेगांव,घोयेगांव,गोधेगांव,लौकी,दहेगाव बोलका,धोत्रे, खोपडी,भोजडे,कान्हेगाव,वारी,सडे,जवळके,वेस,अंजनापूर,बहादरपूर, या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. सुमारे दोन तासाहून अधिक वेळ झालेल्या या पावसामुळे शेतातील उभी पिके मका,कपाशी,सोयाबीन,भईमूग,बाजरी,तूर,कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे.
अहमदनगर जिल्हयातील कोपरगांव तालुक्याच्या पूर्व भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या प्रचंड पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेला आहे.या नैसर्गिक हानीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.कोपरगाव
तालुक्याच्या पूर्वभागातील पढेगांव,करंजी,संवत्सर,कासली,शिरसगांव,
तळेगावमळे,उक्कडगांव,आपेगांव,घोयेगांव,गोधेगांव,लौकी,दहेगाव बोलका,धोत्रे, खोपडी,भोजडे,कान्हेगाव,वारी,सडे,जवळके,वेस,अंजनापूर,बहादरपूर, या गावांना प्रामुख्याने वादळी पावसाचा मोठा तडाखा बसलेला आहे. सुमारे दोन तासाहून अधिक वेळ झालेल्या या पावसामुळे शेतातील उभी पिके मका,कपाशी,सोयाबीन,भईमूग,बाजरी,तूर,कांदा रोपे तसेच भाजीपाला पिकांसह ऊसाचे देखील प्रचंड नुकसान झालेले आहे.अनेक ठिकाणी सोंगणी करुन शेतात पडून असलेली मूग, सोयाबीन व बाजरीची पिके पाण्याखाली भिजून गेली आहेत.पाऊस आणि वादळ इतके वेगात होते की,त्यामुळे ऊसासारखी पीके देखील आडवी झाली आहेत.अनेक ठिकाणची शेती पाण्यामुळे वाहून गेली आहे. अनेक ठिकाणी मोठ मोठी झाडी,पत्र्यांची घरे,झोपड्या,विजेचे खांब देखील कोलमडून पडले आहेत.यावर्षी गेल्या सहा-सात महिन्यांपासून कोरोना संसर्गाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करण्याची वेळ आलेली आहे.असून शासनाने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी.काही ठिकाणी पंचनामे केले आहे.मात्र अद्याप काही ठिकाणी पंचनामे झालेले नाही तरी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणीही जिल्हाप्रमुख राजेन्द्र झावरे यांनी शेवटी केली आहे.
निवेदनावर कोपरगाव तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे,संघटक अस्लम शेख,एस.टी.कामगार सेनेचे अध्यक्ष भरत मोरे,कोपरगाव उपशाहर प्रमुख कलविंदर दडीयाल,अजित सिनगर,भोजडे उपसरपंच विजय भड आदींच्या सह्या आहेत.
अशी मागणी झावरे यांनी केली आहे.