जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पोलिस निरीक्षक राकेश माणगांवकर यांचा सन्मान

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना कालखंडात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आपल्या हद्दीतील नागरिकांचे आरोग्य ठिकठाक राहावे या साठी कठोर उपाययोजना करून कोरोना साथ नियंत्रणात ठेवण्यात अहंम भूमिका निभावल्याने त्यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ या सामाजिक संघटनेच्या वतीने”कोविड योद्धा”हा सन्मान नुकताच प्रदान केला आहे.त्यांच्या या सन्मानाबद्दल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यरत आहे.त्यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा करणाऱ्या “कोविड योद्ध्यांचा” सन्मान करण्याच्या निर्णय घेतला आहे.त्या योजनेअंतर्गत पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचा हा सत्कार करण्यात आला आहे.

माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय चर्मकार महासंघ कार्यरत आहे.त्यांनी कोरोना विषाणूच्या साथीच्या संकटात जिवाची पर्वा न करता अहोरात्र सेवा करणाऱ्या “कोविड योद्ध्यांचा” सन्मान करण्याच्या निर्णय घेतला आहे.त्या योजनेअंतर्गत हा सत्कार करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव शहरातील कार्यक्षम,कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलिस निरीक्षक मानगावकर हेच शहराचे खरे कोविड योद्धे आहेत असा या संघटनेने दावा केला आहे.ते शिस्तप्रिय असल्याने माजी मंत्री बबनराव घोलप यांनी त्यांच्या कार्याची दखल घेउन संघटनेचे शिष्टमंडळ कोपरगाव येथे पाठवुन त्यांचा सत्कार केला आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय सचिव नाशिक मनपाचे माजी आयुक्त दत्तात्रय गोतिसे व संघटनेचे उत्तर विभागीय अध्यक्ष दिलीप कानडे,यांचे हस्ते कोपरगाव येथे संघटनेच्या वतीने सन्मानपत्र देउन सत्कार करण्यात आला यावेळी माजी प स सदस्य तथा जिल्हाध्यक्ष अशोकराव कानडे ,शहर अध्यक्ष गणेश कानडे नाशिक येथील अँड राजाभाऊ लोहकरे,अनिल कानडे,प्रमोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close