कोपरगाव तालुका
कोपरगावात अहिल्यादेवी पुण्यतिथी उत्साहात साजरी
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समिती येथे धनगर सेवा संघातर्फे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची पुण्यतिथी सामाजीक अंतर राखुन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती.दौलतीचा कारभार मोठा होता.पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली.त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली,तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती.लवकरच त्यांचे देहावसान झाले.अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या.
एक अतिशय दानशूर,कर्तृत्ववान,धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे.त्यांचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात माणकोजी व सुशिलाबाई शिंदे या दांपत्यापोटी झाला होता. धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी,खंडेरावांशी झाले.
मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थानची जहागीर दिली होती.दौलतीचा कारभार मोठा होता.पण १७६६ मध्ये त्यांचे निधन झाले आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली.त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली,तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती.लवकरच त्यांचे देहावसान झाले.अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या.पुढील अठ्ठावीस वर्षे त्यांनी राज्यकारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला.तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले.त्यांच्या या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले आहे.
यावेळी निवृत्त अन्नपुरवठा निरीक्षक भाऊसाहेब दुकळे व माजी नगरसेवक सोमनाथ म्हस्के यांचे हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.यावेळी संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब शेळके म्हणाले की,”समाजास जी मरगळ आली आहे ती झटकुन आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र करण्याची वेळ आली आहे.त्यावेळी युवा अध्यक्ष किरण थोरात म्हणाले की,”यापुढे समाज हीतासाठी आम्ही ठोस पावले उचलणार आहोत.यावेळी संघटनेचे सचिव रमेश टिक्कल,राजेंद्र नावडकर, विजय हाळनोर,संतोष चोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.