कोपरगाव तालुका
मेडिकल फोडून चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या धन्वंतरी मेडिकल स्टोअर मधून अज्ञात चोरट्याने सोमवार दि.१० ऑगष्ट रोजी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून व शटर उचकटून त्यातील २ हजार रुपये रोख व व्हिक्स गोळ्या,कॅटबरी,व्हिक्स मलम, व सौन्दर्य प्रसादने आदींसह जमिनी तेलाचा १४ लिटरचा डबा असा ८ हजार ४५० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे शहाजापूर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या संबंधी फिर्यादी व मेडिकल दुकानचे मालक महेश माधवराव मते (वय-४२) रा.साई सिटी कोपरगाव हे सोमवार दि.१० ऑगष्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपले धन्वंतरी मेडिकल स्टोअर रात्री नऊच्या सुमारास बंद करून घरी आले असता ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात गेल्यावर त्यांना हा झाला प्रकार लक्षात आला.
या संबंधी फिर्यादी व मेडिकल दुकानचे मालक महेश माधवराव मते (वय-४२) रा.साई सिटी कोपरगाव हे सोमवार दि.१० ऑगष्ट रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपले धन्वंतरी मेडिकल स्टोअर रात्री नऊच्या सुमारास बंद करून घरी आले असता ते दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आपल्या दुकानात गेल्यावर त्यांना हा झाला प्रकार लक्षात आला.त्यांनी या प्रकरणी तातडीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे
कोपरगाव तालुका पोलीस पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३२०/२०२० भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.ढाका हे करीत आहेत.