कोपरगाव तालुका
अण्णाभाऊ उपेक्षित समाजाचे वाली-अॅड मोकळ
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून व झुंजार लेखनीतून प्रबोधनातून समाज परिवर्तन करताना सामान्य माणसाच्या प्रश्नाला वाचा फोडून त्याना न्याय देणाचा आटोकाट प्रयत्न केला असल्याचा दावा अॅङ सुरेश मोकळ यांनी एका कार्यक्रमात बोलताना केला आहे.
कोपरगावात राष्ट्रीय लहुजी सेना व दलित साहित्य संमेलन कमेटीचे वतीने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षानिमीत्त व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे त्याचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते.
महाराष्ट्राला मुंबई मिळवुन देण्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा मोलाचा वाटा होता.इतकेच नव्हे तर दिड दिवस शाळा शिकलेला माणुस पुढे रशियाला त्याच्या कर्तुत्वावर जातो.आणि रशियाकरांची मने जिंकतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या लढ्याने आणि विचारांच्या प्रभावाने ते आंबेडकरांच्या विचारांचे झाले.पुढे त्यानी शोषित पिडीत उपेक्षित समाजासाठी काम करून समाजापुढे आदर्श ठेवला-अॅङ मोकळ
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”वाटेगाव ते मुंबई पायी प्रवास करून मुंबईत गिरणी कामगार म्हणुन कारकिर्दीला सुरवात करतांना कामगारांच्या समस्या असो अगर सयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो त्यासाठी त्यांनी त्यांची लेखणी झिजवली महाराष्ट्राला मुंबई मिळवुन देण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.इतकेच नव्हे तर दिड दिवस शाळा शिकलेला माणुस पुढे रशियाला त्याच्या कर्तुत्वावर जातो.आणि रशियाकरांची मने जिंकतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जाती अंताच्या लढ्याने आणि विचारांच्या प्रभावाने ते आंबेडकरांच्या विचारांचे झाले.पुढे त्यानी शोषित पिडीत उपेक्षित समाजासाठी काम करून समजा पुढे आदर्श ठेवला.यावेळी अॅङ मोकळ यांनी जुन्या,रुढी परंपरा आणि म्हणीचा समाचार घेताना सांगीतले ‘भेटेल मांग तर फिटेल पांग” हि जर म्हण प्रत्यक्षात उतरवायची असेल तर या देशाचा पंतप्रधान मांगाला करा म्हणजे देशाचे पांग फिटेल नाही तर हि म्हण फक्त मांगाने आमवस्या व पोतराजाने अंगावर साठ मारुन घेण्यापुरती मर्यादीत राहिल असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब नेटके यांनी केले तर आभार परशुराम साळवे यांनी मानले या प्रसंगी दिनेश आरणे, दतु खैरणार आदि मान्यवर उपस्थित होते.