कोपरगाव तालुका
पर्यायी कोरोना केंद्राची कोपरगावला गरज !
![](https://newsseva.in/wp-content/uploads/2020/08/IMG-20200810-WA0024-1-780x405.jpg)
कोपरगाव-(प्रतिनिधी)
मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयातील कोविड केअर सेंटर मधील बेडची संख्या कमी पडत असल्यामुळे नव्याने निष्पन्न होणाऱ्या कोरोना बाधित रुग्णांसाठी प्रशासनाकडून लायन्स मुकबधीर विद्यालयात तात्पुरती व्यवस्था करण्यात आली असून येत्या काही दिवसात जर कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढली तर आत्मा मलिक वस्तीगृहात ३००रुग्णांची व्यवस्था तयार करून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातील असे आश्वासन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच दिले आहे.
कोपरगाव तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३४२ झाली आहे.त्यात सक्रिय रुग्णांची संख्या १५६ आहे.आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आ.काळे यांनी नुकतीच लायन्स मुकबधीर विद्यालयात कोरोना बाधित रुग्णांवर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली व पुढील संभाव्य धोका ओळखून पूर्व तयारी म्हणून आत्मा मलिक वस्तीगृहाची आ.काळे यांनी पाहणी केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगावात काल विक्रमी ८ रुग्ण आढळले होते त्या खालोखाल सोनारी व ब्राम्हणगाव येथे प्रत्येकी २ रुग्ण बाधित आढळले होते तर चांदेकसारे,येसगाव,टाकळी, येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळला असून कोपरगाव शहरात जानकीविश्व व सुभद्रानगर येथे प्रत्येकी एक रुग्ण बाधित आढळल्याने कोपरगाव व तालुक्यात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण पसरले असताना आज सकाळी पुन्हा त्यात दत्तनगर येथील ३४ वर्षीय पुरुष तर भामा नगर येथील ३४ वर्षीय पुरुष असे दोन जण बाधित निघाले होते.त्या नंतर आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हे आठ अहवाल प्राप्त झाले आहे.दरम्यान २४ नागरिकांचे अहवाल आज निरंक आले आहे.या खेरीज सहा अहवाल नगर येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.आता तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या ३४२ झाली आहे.त्यात सक्रिय रुग्णांची संख्या १५६ आहे.आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी आ.काळे यांनी नुकतीच लायन्स मुकबधीर विद्यालयात कोरोना बाधित रुग्णांवर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली व पुढील संभाव्य धोका ओळखून पूर्व तयारी म्हणून आत्मा मलिक वस्तीगृहाची पाहणी केली त्यावेळी हे आश्वासन दिले आहे.यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे
यावेळी त्यांच्या समवेत तहसीलदार योगेश चंद्रे,गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष विधाते,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,एक महिन्यापूर्वी कोरोना बाधित रूग्णांचा आकडा कमी असल्यामुळे काळजी कमी होती मात्र टाळेबंदी उठविण्याचा निर्णयामुळे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमुळे काळजी वाढली आहे. येणाऱ्या संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.भविष्यात कोरोना रुग्णांची संख्या जरी वाढली तरी त्यासाठी लायन्स मुकबधीर विद्यालय,आत्मा मलिक वसतिगृहात करण्यात येत असलेल्या ३०० बेडची व्यवस्था व आजपर्यंत प्रशासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या ठोस उपाय योजना व आज कोरोना बाधित रुग्णाचा आलेला एकेरी आकडा पाहता प्रशासन परिस्थिती नियंत्रनात ठेवील असा विश्वास आ.काळे यांनी यावेळी व्यक्त केला. नागरिकांची जबाबदारी आता वाढली असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये.घराबाहेर पडतांना नेहमी चेहऱ्याला मास्क लावावा व गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे.आपल्या सर्वांच्या सहकार्याशिवाय कोरोना साखळी तोडली जाणे केवळ अशक्य आहे त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आ. काळे यांनी शेवटी केले आहे.