जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव आता रविवारी बंद राहाणार !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात आज कोरोना रुग्णांचा विक्रम स्थापित झाला असून आज १७५ रॅपिड चाचण्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात कोपरगाव सह ३० रुग्ण बाधित निघाले असताना आज सकाळी नगर येथे सिव्हिल हॉस्पिटल येथे तपासणीसाठी पाठवलेल्या १६ श्रावांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात २ रुग्ण बाधित आढळले आहे त्यामुळे आता कोरोना बाधितांची संख्या २१४ वर जाऊन पोहचल्याने प्रशासनही चिंतेत आहे.यावर पर्याय काढण्यासाठी आता प्रशासन सतर्क झाले असून त्यांनी आता शनिवार बंद ठेवण्याऐवजी आता “जनता टाळेबंदी” रविवारी जाहीर केली असल्याची माहिती तहसीलदार योगेश चंद्रे यांचेसह मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी दिली आहे.

पहिल्या व तिसऱ्या शनिवारी शहरातील बँका,एल.आय.सी.आदी वित्तीय संस्था चालू असतात.बँकेच्या कामानिमित्त नागरिक घराबाहेर पडतात.त्यामुळे कोरोना विषाणू साखळी खंडित करणेकामी नागरिकांवर कारवाई करताना अडथळा निर्माण होत असल्याची बाब गांभीर्याने निदर्शनास आली आहे.वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी विषाणू साखळी खंडित करणे गरजेचे आहे.

कोपरगांव शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस विक्रमी पातळीवर वाढत चालली आहे.आता अपर्यंत तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे.अलीकडील काळात दररोज वीस ते तीस रुग्ण बाधित आढळत आहे.हि खूपच चिंतेची बाब ठरली आहे.त्यामुळे आरोग्य विभाग व महसुल,पोलीस प्रशासन चिंताक्रांत बनले आहे.वर्तमानात कोपरगांव शहरात सर्व संमतीने दर शनिवारी “जनता टाळेबंदी” चे पालन करण्यात येत होते.मात्र पहिल्या व तिसऱ्या शनिवारी शहरातील बँका,एल.आय.सी.आदी वित्तीय संस्था चालू असतात.बँकेच्या कामानिमित्त नागरिक घराबाहेर पडतात.त्यामुळे कोरोना विषाणू साखळी खंडित करणेकामी नागरिकांवर कारवाई करताना अडथळा निर्माण होत असल्याची बाब गांभीर्याने निदर्शनास आली आहे.वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी विषाणू साखळी खंडित करणे गरजेचे आहे.शहरातील व्यापारी,सुज्ञ नागरिक शनिवारी ऐवजी “जनता टाळेबंदी” वार बदलून रविवार करावा अशी मागणी करत होते.वत्यामुळे वरील सर्व बाबी विचारात घेता यापुढे “जनता टाळेबंदी” वार आता शनिवार ऐवजी रविवार असणार आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी . तसेच यापूर्वी भाजीपाला बाजार आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे बाजार ओटे येथे गुरुवार व रविवार या दोन दिवशी भरत होता.यापुढे गुरुवार व सोमवार या दोन दिवशी वर नमूद ठिकाणी भाजीपाला बाजार भरणार आहे.याची याची नोंद शेतकरी,भाजीपाला विक्रते व नागरिकांनी घ्यावी असे आवाहन तहसीलदार चंद्रे,मुख्याधिकारी सरोदे,पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close