कोपरगाव तालुका
कारखाना सभासदास दोन लाखांचा धनादेश प्रदान
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील सभासद सूर्यभान जानकू पानगव्हाणे यांचे अपघाती निधन झाले हॊते त्यांचा कर्मवीर काळे कारखान्याने विमा संवरक्षक कवच प्रदान केलेले असल्याने विमा कंपनीने त्यांना नुकताच दोन लाख रुपयांचा विमा आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते सुपूर्त केला आहे.
गत वर्षी गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून जाऊन सूर्यभान पानगव्हाणे यांचे अपघाती निधन झाले होते.कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या सभासदांचा न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडून सभासदांचे विमा संरक्षण कवच घेतलेले असल्याने या कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते त्या नंतर हो रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
गत वर्षी गोदावरी नदीला आलेल्या महापुरात वाहून जाऊन सूर्यभान पानगव्हाणे यांचे अपघाती निधन झाले होते.कारखाना व्यवस्थापनाने कारखान्याच्या सभासदांचा न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीकडून सभासदांचे विमा संरक्षण कवच घेतलेले असल्याने या कंपनीकडे मयत सभासदाच्या अपघात संदर्भातील सर्व कागदपत्र सादर केले होते. न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीने सर्व कागदपत्रांची खातरजमा करून मयत सभासदाच्या वारसाला २ लाख रुपयांची नुकसान भरपाई नुकतीच मंजूर करण्यात आली होती. या नुकसान भरपाईच्या रक्कमेचा धनादेश नुकताच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते मयत सभासद स्व. सूर्यभान जानकू पानगव्हाणे यांचे वारस त्यांचा मुलगा राजेंद्र सूर्यभान पानगव्हाणे यांना देण्यात आला आहे.
यावेळी कार्यकारी संचालक गिरीश जगताप,जनरल मॅनेजर सुनील कोल्हे,सेक्रेटरी बी.बी.सय्यद,उप सचिव एस.डी.शिरसाठ,विमा कंपनीचे प्रतिनिधी आदी मान्यवर उपस्थित होते.