कोपरगाव तालुका
मुखपट्टी नाही,कोपरगावात पाच जणांवर कारवाई !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरांतील कोरोना साथींच्या पार्श्वभूमीवर बेशिस्त नागरिकांना सरळ करण्यासाठी आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधणाऱ्या पाच नागरिकांवर आज सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोपरंगाव शहर पोलीसांनी विविध ठिकाणी विविध केलेल्या कारवाईत पाच जणांवर गुन्हे दाखल केले आहे.त्यामुळे बेजबाबदार नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोपरगाव शहरात सलग कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून आत्तापर्यंत ५६ रुग्ण बाधित आढळले आहे तर सक्रिय रुग्ण २६ असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोपरगावात तर आता राज्य स्तरावर पतसंस्था चळवळीत अग्रस्थानी असलेल्या नेत्यांच्या घरात चार रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
कोपरगाव शहरात काल अखेर अकरा रुग्ण कोरोना बाधित आढळून आले असून बाधित रुग्णांची संख्या पन्नासच्यावर गेली आहे.अनेक कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहे तर अनेकांना विलगीकरण करण्याची मोहीम सुरू आहे.तर अनेक जण उपचारानंतर बरे होऊन घरी येत आहे.तर अनेकांच्या तपासण्यात ते नुकतेच निरंक आले असले तरी नजीकचे येवला,वैजापूर,सिन्नर,नाशिक,नगर,औरंगाबाद,संगमनेर आदी शहरे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले आहे.त्यामुळे धोका वाढला आहे.या खेरीज कोपरगाव तालुक्यात वर्तमानात कोपरगाव शहरात सलग कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून आत्तापर्यंत ५६ रुग्ण बाधित आढळले आहे तर सक्रिय रुग्ण २६ असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.कोपरगावात तर आता राज्य स्तरावर पतसंस्था चळवळीत अग्रस्थानी असलेल्या नेत्यांच्या घरात चार रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या खेरीज,सुरेगाव,वेळापूर,करंजी,रवंदे,समतानगर,काले मळा येथे मोठ्या संख्येने कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहे.त्यामुळे साथ पसरण्याचा धोका वाढलेला आहे.त्यामुळे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे.मात्र अद्यापही काही नागरिक आपल्या बेजबाबदार प्रवृत्तीचे प्रदर्शन घडवत आहेत.त्यामुळे अन्य नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न होऊ शकतो.मात्र ज्या नाठाळ नागरिकांना प्रशासनाची सबुरीची भाषा कळत नाही त्यावेळी पोलिसांना आपल्या दंड्याचे काम नाईलाजाने सुरु करावे लागले आहे.तीच परिस्थिती वर्तमानात उद्भवली आहे.
त्यामुळे पोलिसानी आज सकाळपासून दुपारपर्यंत केलेल्या कारवाईत बेजबाबदारीचे प्रदर्शन करताना आरोपी अर्जित रामदास गर्जे (वय-२९) रा.निवारा कोपरगाव,सन्मित्र मधुकर जोशी (वय-३२) रा.बागुलवस्ती,अन्नपूर्णनगर,सुनील सुरेश भालेराव (वय-३०) खडकी,दत्तात्रय जगन्नाथ ठोंबरे (वय-३०),रा.पूरणगाव,ता.वैजापूर,असिफ अय्युब पठाण (वय-३३) रा.धारणगाव रोड,कोपरगाव आदी पाच जणांवर कारवाई केली आहे.यांनी विविध क्रमांकाच्या विविध दुचाकी,चारचाकीवरून प्रवास करताना कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा धोका असतानाही आपल्या तोंडावर मुखपट्या न बांधता व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करताना मोकटपणे फिरताना आढळून आले आहे.त्यांच्या विरुद्ध फिर्यादी पोलिसानी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि.कलम १८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम-१८५ प्रमाणे विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एच.गायमुखे,डी.आर.तिकोणे आदी अधिकारी हे करीत आहेत.