जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

टाटा सन्स कडून १.३७ लाखांचे वैद्यकीय साहित्य संस्थानला भेट

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्थेच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्‍णालय आणि कोरोना विलगीकरण केंद्राकरीता टाटा सन्‍स, मुंबई यांनी ०१ कोटी ३७ लाख ४३ हजार ६१२ रुपये किंमतीचे मेडिकल सुरक्षा साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले असल्‍याची माहिती संस्‍थानचे कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.

श्री.साई संस्‍थानच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल,श्री साईनाथ रुग्‍णालय व कोविड सेंटरमध्‍ये आरोग्‍य कर्मचा-यांच्‍या सुरक्षतेसाठी मुंबई येथील टाटा सन्‍सचे अध्‍यक्ष एन.चंद्रा यांनी ०१ कोटी ३७ लाख ४३ हजार ६१२ रुपये किंमतीचे मेडिकल सुरक्षा साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले असून यामध्‍ये पी.पी.ई.सुट ५ हजार, एन.-९५ मुखपट्या ८ हजार, फेस शिल्‍ड ५ हजार,आय.प्रोटेक्‍शन गॉगल ५ हजार व सर्जिकल हॅण्‍ड ग्‍लोज १० हजार आदी साहित्‍यांचा समावेश

श्री.डोंगरे म्‍हणाले की,देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवु नये म्‍हणून भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने १७ मार्च २०२० पासून लॉकडाऊन करण्‍यात आलेले आहे.राज्‍यासह अहमदनगर जिल्‍ह्यायातील कोरोना विषाणुचा प्रादुर्भावमुळे रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवुन संस्‍थानच्‍या वतीने दिनांक ०५ एप्रिल रोजी श्री साईधर्मशाळा भक्‍तनिवास येथे इमारत क्र.”ए” विंग तळ मजल्‍यावर विलगीकरण केंद्र सुरु करण्‍यात आले असून इमारत क्र.”बी”व “एफ” मध्‍ये संशयित कोविड रुग्‍णांच्‍या तपासणीसाठी व पुढील उपचारासाठी कोरोना केअर सेंटर आणि डेडीकेटेड कोविड हेल्‍थ केअर सेंटर सुरु केलेले आहे.

संस्‍थानच्‍या श्री साईबाबा हॉस्पिटल,श्री साईनाथ रुग्‍णालय व कोविड सेंटरमध्‍ये आरोग्‍य कर्मचा-यांच्‍या सुरक्षतेसाठी मुंबई येथील टाटा सन्‍सचे अध्‍यक्ष एन.चंद्रा यांनी ०१ कोटी ३७ लाख ४३ हजार ६१२ रुपये किंमतीचे मेडिकल सुरक्षा साहित्‍य देणगी स्‍वरुपात दिले असून यामध्‍ये पी.पी.ई.सुट ५ हजार, एन.-९५ मुखपट्या ८ हजार, फेस शिल्‍ड ५ हजार,आय.प्रोटेक्‍शन गॉगल ५ हजार व सर्जिकल हॅण्‍ड ग्‍लोज १० हजार आदी साहित्‍यांचा समावेश असल्‍याचे सांगुन हे वैद्यकीय सुरक्षा साहित्‍य वैद्यकीय सेवेत कार्यरत असणा-या कर्मचा-यांना लाभदाय ठरेल असे ही श्री.डोंगरे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close