जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राजगृहावरील हल्ला,आरोपींना अटक करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या अहमदनगर उत्तर शाखेच्या वतीने आज कोपरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील ‘राजगृहावर’ हल्ला करणार्‍या आरोपींना तत्काळ अटक करुन कार्यवाही करण्यात यावी आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या चर्मकार गटई कामगारांना शासनाकडुन त्वरीत आर्थिक मदत मिळावी तसेच चर्मोद्योग विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे आदी मागण्या कोपरगावचे तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आल्या आहेत.

मुंबई येथे नुकताच काही असामाजिक तत्त्वांनी घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करून त्यांचे नुकसान केल्याने त्याचे पडसाद राज्यभरासह कोपरगाव तालुक्यातही उमटले आहे.या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई येथे नुकताच काही असामाजिक तत्त्वांनी घटनाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करून त्यांचे नुकसान केल्याने त्याचे पडसाद राज्यभरासह कोपरगाव तालुक्यातही उमटले आहे.या बाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ई-मेल द्वारे निवेदन देऊन आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.त्याची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाकडुन प्रतिक्रिया आली असल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर विभाग महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दिलीप कानडे यांचे नेतृत्वाखाली काळ्या फिती लाऊन प्रथम निषेध नोंदवला गेला त्यानंतर निवेदन सादर करण्यात आले शासनाच्या वतीने नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारत पुढील कार्यवाही करीता वरिष्ठांना आपल्या भावना कळविण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.

या प्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे,युवा जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दुशिंग,जिल्हा सचिव संजय पोटे , उपजिल्हाध्यक्ष देवीदास कानडे,शहर अध्यक्ष गणेश कानडे,युवा तालुका अध्यक्ष संतोष शिंदे, युवा शहर अध्यक्ष संतोष कानडे,तालुका उपाध्यक्ष संजय सरवार,युवा सचिव सागर पोटे,संतोष बारसे आदी पदाधिकारी व समाज बांधव,कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close