सामाजिक उपक्रम
…या गावात परिसर स्वच्छता अभियान उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वारी,जय बाबाजी भक्त परिवार,वारी व राहुल मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट,वारी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत तब्बल ४ तास महाश्रमदान सोहळा व परिसर स्वच्छता अभियान “सप्ताह ४५ वा” मोठ्या उत्साहात राबविण्यात आला आहे.
या अभियानात वारी येथील बाजारतळ परिसरातील पंचशील ध्वज परिसर,अमरधाम व गोदावरी नदी घाट परिसरात मोठ्या प्रमाणात स्वच्छता करण्यात आली.तसेच संकलित केलेला कचरा,प्लास्टिक पिशव्या,काटेरी झुडपा तोडून पेटवून देण्यात आल्या आहे.