कोपरगाव तालुका
धार्मिक भावना दुखावल्या,दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरा नजीक ईशान्येस असलेल्या एका सहकारी कारखान्याच्या परिसरात रहिवाशी असलेल्या व त्या कारखान्याच्या जुन्या नावाचा संदर्भ देऊन ग्रुप खोलणाऱ्या एका नागरिकाने अल्पसंख्यांक समाजाच्या भावना दुखावतील असे चलचित्रण (व्हिडीओ) व्हॉट्सअप या ग्रुपवर प्रसारित केला व त्याला समूह प्रमुखाने कुठलीही आडकाठी केली नाही किंवा काढून टाकले नाही म्हणून कोपरगाव शहरातील एकता कॉलनी बैलबाजार रोड मार्गावरील एका अल्पसंख्याक समाजाच्या जेष्ठ नागरिकाने व्हॉट्सअप समूह चालक व त्यावर धार्मिक भावना दुखावणारा मजकूर प्रसिद्ध करणारा अशा दोघांवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
कारखान्याच्या जुन्या नावाचा वापर करून एका अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकाने एक व्हॉट्सअप (ग्रुप) समूह भ्रमणध्वनिवर संदेशाची देवाण-घेवाण करण्यासाठी उघडला आहे.त्या समूहावर मंगळवार दि.७ जुलै रोजी या समूहाचा सदस्य असलेला एका नागरिकाने अल्पसंख्यांक समाजाच्या धर्म प्रमुखांबद्दल आक्षेपार्ह टिका-टीपणी करून भावना दुखावतील असा मजकूर चलचित्रणाच्या माध्यमातून प्रसारित केला आहे.त्या बाबत हि गंभीर चूक आहे हे समजत असतानाही या अल्पसंख्यांक व्हॉटसअप समुहचालकाने त्यास हरकत घेतली नाही.त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.
कोपरगाव शहराच्या ईशान्येस एक सहकारी साखर कारखाना असून या परिसरात त्याच कारखान्याच्या जुन्या नावाचा वापर करून एका अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकाने एक व्हॉट्सअप (ग्रुप) समूह भ्रमणध्वनिवर संदेशाची देवाण-घेवाण करण्यासाठी उघडला आहे.त्या समूहावर मंगळवार दि.७ जुलै रोजी या समूहाचा सदस्य असलेला एका नागरिकाने अल्पसंख्यांक समाजाच्या धर्म प्रमुखांबद्दल आक्षेपार्ह टिका-टीपणी करून भावना दुखावतील असा मजकूर चलचित्रणाच्या माध्यमातून प्रसारित केला आहे.त्या बाबत हि गंभीर चूक आहे हे समजत असतानाही या अल्पसंख्यांक व्हॉटसअप समुहचालकाने त्यास हरकत घेतली नाही.किंवा त्यास त्या समूहातून काढून टाकले नाही.त्याला कुठलीही समज दिली नाही.हि बाब याच समूहाचा सदस्य असलेल्या तक्रारदाराच्या लक्षात आल्याने त्याने या बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या दोघांवर तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.२५५/२०२० भा.द.वि.कलम.२९५(अ)३४ प्रमाणे या व्हाट्सअप समूह प्रमुख व आक्षेपार्ह चलचित्रण फित टाकणारा अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.