जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नात गायब करून पैसा उकळण्याचा फंडा अखेर उघड !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील टाकळी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या इंदिरानगर या उपनगरात रहिवाशी असलेल्या दहावीत शिकत असलेल्या आपल्या अल्पवयीन नातीस अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवून नेण्यात आल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या आजीने (वय-६५) दाखल केल्याने टाकळी परिसरात खळबळ उडाली असली तरी हि आजी अनेकांना आपल्या जाळ्यात फसवून त्यानां आपली आर्थिक शिकार करीत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.हा गौप्यस्फोट या बेपत्ता मुलीच्या आईने दूरध्वनीवरून पोलिसांना कळवून त्या मुलीला पाठवून देते असे सांगितले व श्रीरामपूर येथील मामाने व नातीनेच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात स्वतः हजर होऊन जबाब दिल्याने या प्रकरणाचा भंडाफोड झाला आहे.त्यामुळे यात शिकार झालेल्या अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

दि.७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिलेची (वय-६५) या महिलेची नात एकाएकी काही न सांगता बाहेर गेली असून तिचा शोध नजीकच्या नातेवाईकांकडे घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे या आजीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.त्यामुळे टाकळी व तालुक्यात या प्रकरणी खळबळ उडाली होती.या नंतर या घटनेचा कोपरगाव शहर पोलिसानी नोंद घेऊन या प्रकरणी शोध सुरु केला असता हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असते की, कोपरगाव तालुक्यात टाकळी ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार आजी आपल्या कुटुंबिया सोबत राहते.सुनेचे व तिचे जमत नसल्याने सून नाशिक येथे एका खाजगी रुग्णालयात नोकरी करते.व आपल्या मुलीला शिक्षणासाठी आजीकडॆ सोपवले आहे. आजीची हि नात अल्पवयीन आहे.ती दहावीत शिकत आहे.मात्र सध्या कोरोनाची टाळेबंदी असल्याने तिने श्रीरामपूर येथील आपल्या मामाला बोलावून घेतले होते व मामाच्या दुचाकीवर बसून ती तक्रार झाल्याच्या दिवशीच सायंकाळी साडे सहाच्या सुमारास आजीला सांगून निघून गेली होती.श्रीरामपूर येथून हि अल्पवयीन मुलगी नंतर आपल्या एका हॉस्पिटलमध्ये काम करीत असलेल्या आईकडे भेटण्यास नाशिक येथे गेली होती.या बाबत मुलीच्या मामानेही या आजीला आपण नातीला घेऊन जात असल्याची कल्पना दिली होती.मात्र आजीने मंगळवार दि.७ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तक्रारदार महिलेची (वय-६५) या महिलेची नात एकाएकी काही न सांगता बाहेर गेली असून तिचा शोध नजीकच्या नातेवाईकांकडे घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे या आजीने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात इसमाविरुद्ध तक्रार दाखल केली होती.त्यामुळे टाकळी व तालुक्यात या प्रकरणी खळबळ उडाली होती.या नंतर या घटनेचा कोपरगाव शहर पोलिसानी नोंद घेऊन या प्रकरणी शोध सुरु केला असता या गुन्ह्याची घटना मुलीच्या आईला नाशिक येथे समजली तिने या बाबत कोपरगाव शहर पोलिसांना दूरध्वनीवर सांगून ती गायब झालेली नाही असे सांगितल्याने पोलिसांचा जीव भांड्यात पडला होता.व मुलीच्या आईने मुलगी व मामाला आपण उद्या पाठवून देते असे आश्वासित केले होते.काल दि.१० जुलै रोजी सकाळी श्रीरामपूर येथील या गायब नातीच्या मामा व बेपत्ता झालेल्या नात हे स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.त्यांना पोलिसी हिसका दाखवला असताना त्यांनीच या पाताळयंत्री आजीचा बुरखा टराटरा फाडला आहे.या घटनेने क्षणभर पोलिसही या प्रकरणाने चक्रावून गेले होते.मात्र या मुलीच्या मामाने व नातीनेच कोपरगाव शहर पोलिसांना या प्रकरणी हजर होऊन जबाब दिला असून आपण बाहेरगावी गेलो की,आजी असे प्रताप करून करत असते असे सांगितले आहे.दरम्यान समजलेल्या माहिती नुसार हि आजी नजीकच्या तरुणांचे नाव पोलिसांना सांगायची व त्यांचे नाव वगळण्याची “बक्कळ कमाई” करण्याचा फंडा या आजीने सुरु केला होता.त्यातून अनेक तरुण बळी गेले असून त्यांचा खिसा आजीने रिकामा केला आहे.तर काहींवर पळवून नेल्याचे गुन्हे दाखल केल्याची उदाहरणे असल्याची माहिती सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.आता या नातीने आपण आता आजीकडे राहणार नसून मामा यांचेकडे श्रीरामपूर येथे राहणार असल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना दिली आहे.

दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीतून एकदाची मानगूट सुटल्याचे व खरा आरोपी समोर आल्याने पोलिसांना हायसे वाटले आहे.तर अनेक तरुणांच्या डोक्यावरच टांगलेली तलवार आता पोलिसांनी व चौकशी अधिकाऱ्यांनी काढून टाकल्याने अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.कोपरगाव शहर पोलिसानी या नातीच्या मामाचे व नातीचे जबाब नोंदवून अखेर हि नुक्ती न्यायालयात सोपवून हि बाब न्यायल्यावर सोपविण्याचा निर्णय घेतला आहे.आता न्यायालय काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close