जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोरोनाखेरीज अन्य रुग्णांना उपचार सुविधांची गरज-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून योग्य प्रकारे काळजी घेतली जात असून तालुक्यातील सात कोरोना बाधित रुग्णांनी या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेवून कोरोनावर मात केली आहे.कोविड केअर सेंटरमध्ये सध्या पाच रुग्ण उपचार घेत असून कोरोना रुग्णाखेरीज अन्य रुग्णांसाठी डायलिसिस सेंटर व इतर सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्याकडे नुकतीच केली आहे.

कोपरगावच्या शेजारी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत असतांना कोपरगाव तालुक्यात परिस्थिती चांगली असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करून लोकप्रतिनिधी व अधिकऱ्यांचे कौतुक केले.यावेळी कोपरगाव तालुक्यात कोरोनाखेरीज रुग्णासाठी डायलिसिस सेंटरच्या उपलब्ध करवून द्यावे-आ.काळे.

आज गुरुवार दि.९ जुलै रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोना साथीची आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदार संघात कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजवर करण्यात आलेल्या उपाय योजनांची माहिती पालकमंत्र्याना दिली.कोपरगावच्या शेजारी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण सापडत असतांना कोपरगाव तालुक्यात परिस्थिती चांगली असल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करून लोकप्रतिनिधी व अधिकऱ्यांचे कौतुक केले.यावेळी डायलिसिस सेंटरच्या मागणी बरोबरच इतर मागण्याही आ.काळे यांनी केल्या. यामध्ये सध्या पावसाळा सुरु असून साथीच्या रोग निवारणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांना औषधांचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा. खतांचा निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी मागणीप्रमाणे खतांचा पुरवठा करावा.पुरवठा विभागाकडून तालुक्यात वेळेवर रेशन वितरण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्या आदी मागण्या त्यांनी सदर बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केल्या आहेत.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्री घुले,उपाध्यक्ष प्रताप शेळके,राहुल द्विवेदी,जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर,जिल्हा कृषी अधिकारी शिवाजी जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close