जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

शिक्षक बँकेत झालेल्या बदल्यांची चौकशी करा-मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोनाच्या कालावधीत संपुर्ण देश अडचणीत आहे.या काळात बदल्या व पदोन्नती करु नये असे शासनाचे निर्देश असतांनाही,अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत गेल्या तीन-चार महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल्या व पदोन्नत्या करण्यात आल्या आहेत.या सर्व बाबीची चौकशी होऊन संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे व कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी नुकतीच सहकार विभागाकडे केली आहे.

कोरोनाच्या काळात प्राथमिक शिक्षक बँकेत मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या.ज्या कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊन एक वर्षही पुर्ण झाले नव्हते त्यांना पुन्हा पुर्वीच्याच ठिकाणी नेमणुका देण्यात आल्या.मग यापुर्वी बदली करुन बँकेचा पैसा का खर्ची घालण्यात आला ? असा महत्वपूर्ण सवाल त्यांनी विचारला आहे.बँकेच्या कर्मचार्‍यांच्या गैरसोईच्या बदल्या करायच्या व नंतर “आर्थिक लाभ” पदरात पाडुन त्याची पुन्हा सोय केलेली दाखवायची हा किळसवाणा प्रकार गेल्या पाच वर्षांपासुन चालु आहे.

जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची आर्थिक कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक सहकारी बँकेत नुकत्याच सरकारने प्रतिबंध केलेला असतानाही सत्ताधारी वर्गाने या बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्याने वादळ उठले आहे.या पार्श्वभूमीवर प्राथमिक शिक्षक सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे व कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विनोद सोनवणे यांनी हि मागणी नुकतीच जिल्हा सहकार विभागाकडे केली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.

या बाबत शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या वतीने जिल्हा सहकारी विभागाचे उपनिबंधक यांची शिष्टमंडळाने समक्ष अहमदनगर येथे भेट घेऊन चर्चा करण्यात आली.कोरोनाच्या काळात प्राथमिक शिक्षक बँकेत मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या.ज्या कर्मचार्‍यांच्या बदल्या होऊन एक वर्षही पुर्ण झाले नव्हते त्यांना पुन्हा पुर्वीच्याच ठिकाणी नेमणुका देण्यात आल्या.मग यापुर्वी बदली करुन बँकेचा पैसा का खर्ची घालण्यात आला ? असा महत्वपूर्ण सवाल त्यांनी विचारला आहे.बँकेच्या कर्मचार्‍यांच्या गैरसोईच्या बदल्या करायच्या व नंतर “आर्थिक लाभ” पदरात पाडुन त्याची पुन्हा सोय केलेली दाखवायची हा किळसवाणा प्रकार गेल्या पाच वर्षांपासुन चालु आहे.तसेच शिक्षक बँकेत कर्माचार्‍यांची बढती करतांना मोठ्या प्रमाणात अनियमितता असुन त्यातही मोठा “लाभ” संचालक मंडळाने मिळवला असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. सदर दोन्ही बाबींची चौकशी होऊन संचालक मंडळ बदली झालेले व पदोन्नती मिळालेले कर्मचारी यांची नार्को चाचणी करावी म्हणजे सर्व सत्य बाहेर येईल अशी मागणी माळवेंसह विनोद सोनवणे,रामकृष्ण काटे,बप्पासाहेब शेळके,संतोष टकले,महादेव गांगर्डे,अण्णा कांदळकर,सतिष डावरे,चंद्रकांत मोरे,बाळु मोरे,सुधाकर बोर्‍हुडे,शैलेश खनकर,सुनिल झावरे,कारभारी बाबर आदिंनी केली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close