कोपरगाव तालुका
“मका”आता पीक विमा संरक्षण यादीत सामील !
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त विमा कंपनी मार्फत सोयाबीन,बाजरी,कपाशी आदी पिकांचा पिक विमा संरक्षण लाभात असताना मात्र मका पीक या संरक्षणापासून वंचित होते याकडे लक्ष वेधून या पिकाचा आता विमा यादीत समावेश करण्यात आला असल्याची माहिती कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.वास्तविक हा धोरणात्मक निर्णय असताना हे श्रेय एकटे आ. काळे कसे घेऊ शकतात ? हा प्रश्न या निमित्ताने पुढे आला आहे.
या वर्षी कोपरगाव तालुक्यात मका पिकाखाली १३ हजार ५७६ हेक्टर क्षेत्र आले आहे.गत वर्षी हेच क्षेत्र १८ हजार ३९५ हेक्टर इतके होते.म्हणजेच या वर्षी मका पिकाखाली ४ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र घटले आहे.विशेष म्हणजे हा निर्णय खरिपाच्या पेरण्या होण्याआधी अपेक्षित असताना तो खरीप पिकांच्या पेरण्या झाल्यावर का घेतला हे समजण्यास मार्ग नाही.
सर्वकष पीक विमा योजनेची पीक कर्ज घेणाय्रा शेतकऱ्यापुरते मर्यादीत स्वरूप बदलून कर्जदार तसेच बिगर कर्जदार अशा सर्वच शेतकऱ्याना सहभागी करून घेणारी राष्ट्रीय कृषी विमा योजना हि सुधारीत स्वरूपात सन १९९९-२००० च्या रब्बी हंगामापासुन राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये विमा संरक्षित रकमेवरील मर्यादा (रू. १०,०००) रद्द होऊन पेरणी केलेल्या संपूर्ण क्षेत्राला विमा संरक्षण देण्याची तरतुद या राष्ट्रीय कृषी विमा योजनेत करून देण्यात आली आहे.मात्र गत वर्षी मका या पिकाला या विमा संरक्षण यादीतील वगळण्यात आले होते.गत वर्षी लष्करी अळीने कहर केला होता.तयावेळी राज्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत मका पिकाचा समावेश करावा अशी मागणी केली होती.व हा विषय सार्वत्रिक बनला होता.याबाबत कोपरगावच्या आ.काळे यांनी आपण या मका पिकांसाठी विमा योजना राबवावी अशी मागणी केल्याचा दावा केला आहे.व नगर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेवून कोपरगाव तालुक्यासाठी मका पिकाचा पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये समावेश करून मका पिकाला विम्याचे कवचकुंडले दिल्याचा दावा केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, बाजरी, कपाशी आदी पिकांबरोबरच मका पिकाला देखील विमा संरक्षण मिळणार आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात या वर्षी मका लागवडी खाली येणाऱ्या मका पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला होता.मात्र मागील वर्षी लष्करी अळीच्या हल्ल्यात मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्यामुळे यावर्षी चालू हंगामात मका पिक घ्यायचे का नाही या विवंचनेत शेतकरी सापडला असतांना कोपरगाव तालुक्यासाठी पंतप्रधान पिक विमा योजनेमध्ये मका पिकाचा समावेश करण्यात आल्यामुळे यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आ. काळे यांचे मका उत्पादक शेतकऱ्यांनी आभार मानल्याचा दावा त्यांच्या प्रसिद्धी विभागाने केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आज अखेर एकून १३ हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली असल्याची माहिती कोपरगाव तालुका कृषी विभागाने दिली असून या मका क्षेत्राला आधार मिळाला आहे.
या वर्षी कोपरगाव तालुक्यात मका पिकाखाली १३ हजार ५७६ हेक्टर क्षेत्र आले आहे.गत वर्षी हेच क्षेत्र १८ हजार ३९५ हेक्टर इतके होते.म्हणजेच या वर्षी मका पिकाखाली ४ हजार ८१९ हेक्टर क्षेत्र घटले आहे.विशेष म्हणजे हा निर्णय खरिपाच्या पेरण्या होण्याआधी अपेक्षित असताना तो खरीप पिकांच्या पेरण्या झाल्यावर का घेतला हे समजण्यास मार्ग नाही.