जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील “जिल्हा परिषद शाळा डाऊच बु. या शाळेचा विद्यार्थी दुर्वेश हरिभाऊ ठाणगे याची जवाहर नवोदय विद्यालयासाठी नुकतीच निवड झाली आहे. त्याच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

जवाहर नवोदय विद्यालय ही शत प्रतिशत केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती.ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात.यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते.या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्यातून १३०० ते १४०० विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत वरच्या दर्जाच्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ६ वी -१२ वी मोफत शिक्षण मिळते.

जवाहर नवोदय विद्यालय ही शत प्रतिशत केंद्र शासन अनुदानीत विद्यालये आहेत. ही योजना पी.व्ही. नरसिंहराव यांनी मांडली होती.ही विद्यालये मनुष्यबळ विकास मंत्रालयाव्दारे राबविली जातात.यात प्रवेशासाठी प्राथमिकता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दिला जातो.येथे भारतातील काही विशेष,गुणी विद्यार्थांना शिकण्याची संधी मिळते.या विद्यालयात शिक्षण मिळवण्या साठी प्रत्येक वर्षी प्रत्येक जिल्यातून १३०० ते १४०० विद्यार्थी एक परीक्षा देतात ज्या परीक्षेत वरच्या दर्जाच्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना ६ वी -१२ वी मोफत शिक्षण मिळते.ज्याचा पूर्ण फायदा घेऊन विद्यार्थी देशाच्या विकासासाठी कार्यरत होतात.

जानेवारी २०२० मध्ये केंद्रिय मनुष्यबळ मंत्रालय दिल्ली यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या नवोदय परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला आहे.या परिक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डाऊच बु.या शाळेचा विद्यार्थी दुर्वेश हरिभाऊ ठाणगे याची निवड झाली आहे.

या यशस्वी विद्यार्थ्याचे कोपरगाव पंचायत समीतीचे गटशिक्षणाधिकारी श्री.काळे,उपसभापती अर्जुन काळे,चांदेकसारे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. ढेपले,शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी पंडीत यांनी अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्याला वर्गशिक्षक श्री.अढांगळे सर,खरात सर,मुकोटे सर,श्रीम.मोरे मॅडम व श्रीम.ठाणगे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले होते.शाळेच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य,डाऊच बु.ग्रामपंचायतचे सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच गावातील शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close