कोपरगाव तालुका
बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत या संस्थेचे १३८ विद्यार्थी यशस्वी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अहमदनगर येथील जनसेवा सामाजिक, शैक्षणिक प्रतिष्ठाणच्या वतीने घेतल्या जाणा-या डॉ. सी.व्ही. रमन बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाचे १३८ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळविले व सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत येण्याचा मान पुन्हा एकदा आत्मा मालिकला मिळाला आहे.
मुंबई विज्ञान शिक्षक संघटनेतर्फे घेतली जाणारी प्रतिष्ठेची ‘डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा’ येत्या २१ सप्टेंबरला संपन्न झाली होती. राज्यभरातून तब्बल ४३ हजार विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची आवड निर्माण होऊन ती जोपासली जावी, त्यांना स्पर्धा परीक्षांचा अनुभव मिळावा या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जाते. दरवर्षी या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद वाढतो आहे. गेल्या वर्षी या परीक्षेसाठी राज्यभरातून ४० हजार विद्यार्थी बसले होते.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आत्मा मालिक माऊली,ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे,कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन,प्रभाकर जमधडे,प्रकाश भट,बाळासाहेब गोर्डे,प्रकाश गिरमे,माधवराव देशमुख,व्यवस्थापक हिरामण कोल्हे यांनी अभिनंदन केले आहे.